जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव लायन्स क्लब,प्रवरा मेडिकल ट्रस्ट,कोपरगाव व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी नऊ वाजता विवेकानंदनगर येथील लायन्स पार्क येथे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,व लायन्स अध्यक्ष सुधीर डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले आहे.

विविध व्यवसायांतील आणि उद्योगधंद्यांतील लोकांनी परस्पर-सहकार्य व मानवतेच्या सेवाभावी कार्यासाठी स्थापन केलेल्या मंडळांची (क्लबांची) जगातील सर्वांत मोठी संघटना. तिचे अधिकृत नाव ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज’ असे असले, तरी ‘लायन्स इंटरनॅशनल’ ह्या नावानेच ती विशेष प्रसिद्ध आहे.

लायन्स क्लब या संघटनेची स्थापना टेक्सास राज्यातील डॅलस येथे मेल्व्हिन जोन्स यांनी १९१७ मध्ये केली.जगातील १६६ हून अधिक स्वतंत्र देशांत या संस्थेच्या सुमारे २८ हजार ५०० शाखा असून सदस्यांची संख्या दहा लाखांवर आहे.भारतात या संस्थेची सुरुवात १९५६ साली झाली.प्रथम मुंबई व दिल्ली येथे या संस्थेच्या शाखा उघडण्यात आल्या होत्या आता देशभर या संस्थेचा विस्तार आहे.

जवळपास गत वर्षभरापासून देशभरासह जगभरात कोरोना साथीचे संकट घोंगावत आहे.त्यामुळे देशभर जवळपास एक लाख ४७ हजार रुग्णांनी आपले प्राण गमावले आहे.त्यामुळे देशात अभूतपूर्व रक्त टंचाई निर्माण झाली आहे.रुग्णांना कोरोना सोबत अन्य आजारांनी डोके वर काढले आहे.या प्रार्श्वभूमीवर कोपरगाव येथील लायन्स क्लब व लायनेस क्लब,लिओ क्लब यांच्या पुढाकारातून व प्रवरा मेडिकल ट्रस्ट,कोपरगाव व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी अकरा वाजता विवेकानंदनगर येथील लायन्स पार्क येथे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,व लायन्स अध्यक्ष सुधीर डागा यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सुमारे ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती लायन्स अध्यक्ष सुधीर डागा यांनी दिली आहे.त्यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरसेवक मंदार पहाडे,प्रकल्प प्रमुख राजेश ठोळे, अमित लोहाडे,लायनेसच्या अध्यक्षा किरण डागा,सचिव भावना गवांदे,आरती शिंदे,लायन्स सचिव अड्.मनोज कडू,खजिनदार राजेंद्र शिरोडे,लिओ अध्यक्ष रोहित पटेल,जेष्ठ लायन्स तुलसीदास खुबाणी,फुलचंद पांडे,डॉ.कांतीलाल वक्ते,रवींद्र नेवगे,संजय उदावंत,लिओ सचिव पारस पटेल,लिओ खजीनदार संकेत पटेल,आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close