जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी दूध संघातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका दूध संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड ( एन. डी. डी. बी. ) यांच्या संयुक्त सहकार्याने वृक्षारोपणासह पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात राबविण्यात आला आहे.

दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होतेय,प्रदुषणाची समस्या वाढतेय.अनेक ठिकाणची जंगले विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जातात.केवळ आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या स्त्रोतांचा अमाफ वापर केला जातोय, त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर केला जातोय.पृथ्वीवर आणि समुद्रातही प्लॅस्टिकचे साम्राज्य वाढलंय.त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे.त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जात आहे.

जगभरात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय.हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम आहे.वसुंधरेची चिंता असलेले,त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक,संघटना,पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस उत्साहाने साजरा केला जातोय.आज जगासमोर हवामान बदलाचं संकट उभं आहे.दिवसेंदिवस जागतिक तापमानात वाढ होतेय,प्रदुषणाची समस्या वाढतेय.अनेक ठिकाणची जंगले विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त केली जातात.केवळ आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाच्या स्त्रोतांचा अमाफ वापर केला जातोय, त्याचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर केला जातोय.पृथ्वीवर आणि समुद्रातही प्लॅस्टिकचे साम्राज्य वाढलंय.त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजिवांचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे.त्यामुळे जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यामागे या पृथ्वीची काळजी आणि तिला वाचवण्याची तळमळ आहे.या पार्श्वभूमीवर गोदावरी परजणे तालुका सहकारी दुध संघाने हा दिन साजरा केला आहे.
गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाच्या कार्यक्षेत्रातील संवत्सर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.लिंब,पिंपळ,चिंच,वड,नारळ व इतर पर्यावरणाला पुरक अशा विविध झाडांची रोपे यावेळी लावण्यात आलीत.या शिवाय पर्यावरण संरक्षणाचा एक भाग म्हणून परिसरातील निसर्गाला हानीकारक ठरणारा प्लॅस्टीकचा व इतर अनावश्यक कचरा गोळा करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्यासाठी संघाचे अधिकारी, कर्मचारी तसेच राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर व त्यांच्या टीमने सक्रीय सहभाग घेतला.पर्यावणाचे महत्व फक्त जागतिक पर्यावरण दिनापुरते मर्यादित न राहाता तो एक पर्यावरणपुरक जीवनशैलीचा भाग व्हावा ही आजच्या काळाची नितांत गरज असल्याने पृथ्वीवरील घटकांचे संवर्धन,संरक्षण व जतन करण्यासाठी आपण सर्वांनीच कार्यरत होण्याची आवश्यकता आहे. पर्यावरणाचे महत्व जाणून घेवून राज्याच्या पर्यावरण विभागाने सुरु केलेले ‘ माझी वसुंधरा अभियान’ यशस्वी होण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानामध्ये सहभागी हाण्याची आज नितांत गरज आहे. भविष्यातील नैसर्गिक आपत्ती व पर्जन्यमान विचारात घेता आज झाडे लावण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची नितांत गरज असल्याचे मत संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी व्यक्त केले.संघाने यापूर्वीही पर्यावरणाला पूरक ठरतील असे विविध कार्यक्रम कार्यक्षेत्रात राबविले आहेत. संघाच्या संलग्न असलेल्या दूध संकजन करणाऱ्या संस्थांमार्फत गांवोगांवी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आलेला आहे. त्यास कार्यक्षेत्रातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close