जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात मेडिकल फोडले,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गांधी चौक या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रसराज मेडिकल स्टोअर्सचा रात्री दहा वाजेनंतर लाकडी दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यानी मेडिकल मधील ४२ हजार रुपये रोख व ०५ हजार रुपये कंपनीचा एअरटेल कंपनीचे सिमकार्ड असलेला लिनोव्हा कंपनीचा भ्रमणध्वनी संच असा ४७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याने शहरातील दुकानदारात भीतीचे वातावरण पसरले आहे.

फिर्यादीच्या रात्रीच्या सुमारास आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले व ते आपल्या सुखशांतीनगर येथील घरी निघून गेले त्या नंतर रात्री कधी तरी अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन या चौकात कोणी नाही ही बाब हेरून आपली विशेष कला दाखवली आहे.

कोपरगाव शहरात वर्तमानात चोरट्यानी आपली हात की सफाई दाखवायला सुरुवात केली आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र संपल्यावर विशेषतः यात लक्षणीय रित्या वाढ झाली आहे हे विशेष!

चोरट्यांवर दबाव वाढविण्याचे आव्हान वर्तमान काळात शहर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.दुचाकी चोरी,रस्ता लूट,महिलांचे दागिने ओरबडणाऱ्या टोळ्या पुन्हा कार्यरत झाल्याने नागरिकांत चिंता निर्माण झाली आहे.अशीच घटना रविवार दि.२७ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेनंतर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौकात घडली आहे.या ठिकाणी तालुका पोलीस ठाण्याची चौकी हाकेच्या अंतरावर आहे हे विशेष! या ठिकाणी असलेले शैलेश केशवराव साबळे (वय-३९) यांच्या मालकीचे रसराज मेडिकल स्टोअर्स नावाचे औषधी विकण्याचे दुकान आहे.

त्यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले व ते आपल्या सुखशांतीनगर येथील घरी निघून गेले त्या नंतर रात्री कधी तरी अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन या चौकात कोणी नाही ही बाब हेरून आपली विशेष कला दाखवली आहे व दुकानातील ५००,२००,१०० रुपये किमतीच्या नोटा असा ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे शिवाय तेथे असलेला एअर टेल कंपनीचे सिमकार्ड असलेला लिनोव्हा कंपनीचा भ्रमणध्वनी फरार केला आहे असा एकुण चोरट्यानी ४७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने मेडिकल स्टोअर्सचे मालक शैलेश साबळे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.८५६/२०२० भा. द.वि.कलम ४५७,३८०,४२७ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी भेट दिली असून पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close