जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेचा सासरी छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील माहेर व श्रीरामपूर कचेरी रोड येथील सासर असलेल्या विवाहित महिलेला तिचा नवरा धनंजय अशोक कांदळकर,सुरेखा अशोक कांदळकर आदींनी,”तू आवडत नाहीस” या कारणावरून वारंवार शिवीगाळ करून दमदाटी करून तिला उपाशीपोटी ठेऊन शारीरिक मानसिक त्रास दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला कावेरी धनंजय कांदळकर (वय-२७) हिने गुन्हा दाखल केला आहे.

सन-१९८३ साली भादंविच्या विसाव्या प्रकरणामध्ये २० ए हे प्रकरण व कलम ४९८ मध्ये ४९८ (अ ) हे उपकलम घालण्यात आले. ४९८ (अ) ही कौटुंबिक हिंसेची दखल घेणारी एक तरी तरतूद मिळाली ही एकीकडे स्वागतार्ह बाब असताना आजही महिला सुरक्षित आहे का असा सवाल निर्माण होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे घडली आहे.

सन-१९८० नंतर हुंडय़ामुळे विवाहित स्त्रियांचा होणारा छळ,हत्या किंवा त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे या प्रकारच्या गुन्ह्यांचे वाढते प्रमाण आणि तीव्रता याकडे स्त्रीवादी चळवळीने समाजाचे आणि कायदेकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.या प्रकारच्या गुन्ह्यांची दखल घेतली जाण्यासाठी योग्य कायद्याची मागणी पुढे आली.१९८३ साली भादंविच्या विसाव्या प्रकरणामध्ये २० ए हे प्रकरण व कलम ४९८ मध्ये ४९८ (अ ) हे उपकलम घालण्यात आले. ४९८ (अ) ही कौटुंबिक हिंसेची दखल घेणारी एक तरी तरतूद मिळाली ही एकीकडे स्वागतार्ह बाब असताना आजही महिला सुरक्षित आहे का असा सवाल निर्माण होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे घडली असुन या प्रकरणी कोपरगाव तालुक्यातील पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला कावेरी कांदळकर हिने दाखल केली आहे.त्यामुळे सांगवी भुसार व परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी तिने आपला नवरा व अन्य नातेवाईक यांनीं आपल्या विरुद्ध दि.१ नोव्हेंबर २०२१ ते दि.२९ ऑगष्ट २०२२ दरम्यान हा त्रास दिला असल्याचे म्हटलं आहे.

या कालावधीत त्यांनी तिला सासरी नांदत असताना वेळो वेळी शारीरिक मानसिक त्रास देऊन,”तू,मला आवडत नाही” या कारणासाठी शारीरिक मानसिक त्रास दिला आहे.वारंवार शिवीगाळ करून तिला उपाशीपोटी ठेवले असल्याचा आरोप केला आहे.व नांदविण्यास नकार देऊन तिला घरातून हाकलून दिले आहे.तिने या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४७५/२०२२ भा.द.वि.कलम ४९८(अ) ३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड याचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सुरेश बोटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close