कोपरगाव तालुका
दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समितीच्या संयुक्त मंत्रीपदी गंगवाल यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील मनसेचे कार्यकर्ते व अहमदनगर जिल्हा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष कांतीलाल गंगवाल यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन प.पु.आचार्य देवनंदीजी महाराज यांच्या सहकार्याने नमोकार तीर्थ क्षेत्र चांदवड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांची राज्यपातळीवर भारतीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमेटीची निवड जाहीर झाली असून त्यात त्यांची महाराष्ट्र अंचल संयुक्तमंत्री पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
सदर प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष शिखर पहाडिया,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनिल जमगे,राजाबाजार दिगंबर जैन समाज अध्यक्ष ललित पाटणी,तसेच कचनेर संस्थान विश्वस्त संतोष पेंढारे,महामंत्री डॉ.महावीर शास्त्री महामंत्री
नीलम अजमेरा,समेर काला,विजय कासलीवल, दिव्यांगसेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल,राजेंद्र घाडगे,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.