गुन्हे विषयक
..या शिवारात कूजलेला मृतदेह,परिसरात खळबळ

जनशक्ती न्यूजसेवा
वाकडी-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील वाकडी ममदापूर शिवारात अनोळखी व्यक्तीचा कूजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार हत्या,आत्महत्या या बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या आधी साधारण तीन वर्षापूर्वी याच परिसरात एका फळबागेत असाच एक कूजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अस्तगाव-नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करत असताना उसाच्या शेतातून उग्र वास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”अस्तगाव-नांदूर रस्त्यावरील ममदापूर वाकडी शिवारात रस्त्यालगत एक शेतकरी शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करत असताना उसाच्या शेतातून उग्र वास येत असल्याने या शेतात एखादा प्राणी कूजलेला आहे की ही खात्री करण्यासाठी आणखी काही शेतकरी जमा करून घटनास्थळी गेले असता त्याठिकाणी एका पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह कूजलेल्या अवस्थेत आढळून आला.
३५ ते ४० दरम्यान वयवर्ष असलेल्या या व्यक्तीच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व खाकी कलरची पॅन्ट आहे.मृतदेह अत्यंत कूजलेला असल्यामुळे या व्यक्तीची ओळख पटविणे मुशकील आहे. या घटनेची माहिती वाकडी गावचे पोलीस पाटील मच्छीन्द्र अभंग,सरपंच डॉ संपतराव शेळके यांना दिली असता श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह अतिशय कूजलेला असल्यामुळे शवविछेदन करणे मुशकील होणार आहे.दुपारी उशिरापर्यंत हा मृतदेह जागेवर होता.या ठिकाणी श्वास पथक बोलविन्यात आले होते.या घटनेमुळे परिसरात शेतकरी व रहिवाशी वर्गात प्रचंड भीती निर्माण झाली आहे एरवी या भागात होणारी लूटमार व इतर गुन्हेगारीचे प्रकार बरेच महिने पासून थांबले होते हा प्रकार नेमका हत्या की आत्महत्या या बाबद सध्या चर्चा सुरु आहे.