निवडणूक
पश्चिम घाटमाथ्याचे पाणी तुटीच्या खोऱ्यात उपलब्ध करून देणार-पवार

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
सह्याद्रीच्या पश्चिम घाटमाथ्याचे पडणारे पाणी आपण पूर्वेस वळवणार असून त्याचा लाभ कोपरगाव अन्य तालुक्यातील गोदावरी तुटीच्या खोऱ्यात देणार आहे.त्यासाठी ८५ हजार कोटी निधी लागणार आहे.त्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांचेशी बोललो असून त्यांनी आपल्याला आश्वासन दिले असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच कोपरगाव येथील एका सभेत बोलताना केले आहे.

“कोपरगाव विधानसभा मतदार संघात शहरानजीक ४३३ एकर जमीन आहे त्या ठिकाणी औद्योगिक वसाहत आणून उद्योग वाढवावे त्यासाठी मदत मिळावी.६३३ कोटी रुपये शहराला दिले आहे.भुयारी गटार मंजूर झाली आहे.भूमिगत विद्युत वाहिन्या सुरू करण्यास मदत करावी,आपले सरकार आगामी काळात पुन्हा येणार आहे म्हणून ही कामे सांगत आहे” – आ.आशुतोष काळे.उमेदवार,कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री तथा धाकटे अजित पवार यांची जाहीर सभा गुरुवार दि.१४ नोव्हेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान कोपरगाव येथे सायंकाळी ०६ वाजता आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी माजी आ.अशोक काळे,माजी नगराध्यक्ष विजय वाहाडणे,गोदावरी दूध संघाचे
अध्यक्ष राजेश परजणे,शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,बी.एस.एन.एल.चे संचालक रवींद्र बोरावके,राजेंद्र जाधव,संभाजी काळे,चैताली काळे,कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण,अशोक रोहमारे,कृष्णा आढाव,चारुदत्त सिनगर,नारायण मांजरे,पदमकांत कुदळे,अजय गर्जे,डॉ.मच्छिंद्र बेर्डे,सचिन मुजगुले,चंद्रशेखर कुलकर्णी,शकील चोपदार,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”या वळण योजनांसाठी जागतिक बँकेचा निधी लागला तरी तो आपण आणणार आहे पण या तालुक्यांना कमी पडणारे पाणी द्यावे लागणार आहे.यातून अनेक भांडणे होत आहे.त्यावेळी त्यांनी
निळवंडे पाणी प्रश्न छेडला असून तो ५४ वर्ष तसाच ठेवला असल्याचा आरोप केला आहे.याची आपल्या सरकारने मागील वर्षी चाचणी आपण घेतली आहे.सात तालुक्यांना व १८२ गावांना पाणी मिळणार आहे.
त्यावेळी आ.आशुतोष काळे यांचे कामाचे कौतुक करताना म्हणाले की,”
कोपरगाव तालुक्याने एक चांगले धडाडीचे नेतृत्व दिले आहे.जिल्ह्याचे नाव बदलले आहे.या जिल्ह्याचे मला कौतुक आहे.कारण आपले आजोळ देवळाली प्रवरा आहे.
त्यावेळी खा.काळे यांचे बरोबर काम करण्याची संधी मिळाली होती.मागील वेळी तुम्ही ८२२ मतांनी निवडून दिले तरी त्यांनी हजारो कोटींची कामे केली आहे.पुस्तक प्रसिद्ध केले आहे ते उगीच नाही त्यावेळी त्यांनी माजी आ.कोल्हे,बिपिन कोल्हे,विवेक कोल्हे आदींचे कौतुक केले आहे.आ.आशुतोष काळे याला आशीर्वाद मागितला त्यांनी त्यास दुजोरा दिला आहे.त्यांचा सन्मान ठेवला जाईल.मागील वेळी कसेबसे निवडून दिले आता ८५ हजारांनी निवडून द्या उगीच थापा मारू नका असे आवाहन केले आहे.अनेक नवीन चेहऱ्यांना आपण मागील निवडणुकीत संधी दिली होती.त्यांच्या पाठीशी उभे राहिलो.खरे बोलण्याची किंमत चुकवावी लागली असल्याची कबुली दिली आहे.आता महायुतीच्या सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे
आ.काळे यांनी सर्वांसाठी मागतो.त्याला निवडून द्या.साठवण तलाव दिला.पाणी दिले आहे.अनेक महात्मा पुरुषांना निधी दिला आहे.सर्व कल्पना योजनाना आपण निधी कमी पडून देणार नाही आगामी काळात काही कमी पडू देणार नाही.जेवढे लीड तेवढा जास्त निधी देईल सिन्नर बघा आपण तेथे किती निधी दिला आहे.
राज्याचे काही पुढारी (शरद पवार यांचे नाव न घेता )मोघम बोलतात त्यावर त्यांनी टीका केली आहे ते संविधान बदलण्याची चुकीची भाषा करतात.त्याबद्दल अफवा पसरवतात.सी.ए.ए.कायद्याची मुस्लिमाना फसवत असल्याची त्यांनी टीका केली आहे.आपल्या लोकांना परत आणण्यासाठी ती सोय केली आहे.अशा अफवा पसरवतात.तुम्हाला पाकिस्तान,बांगलाला पाठवणार असल्याच्या अफवा पसरवतात आहे फेक नेरेटीव्ह पसरवून अशांतता निर्माण करत आहे त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.सहकारी साखर कारखान्यांचा विक्रीकर सहकार मंत्री अमित शहा यांनी उदार अंतःकरणाने माफ करून घेतला असल्याची माहिती दिली आहे.कांदा निर्यात शुल्क माफ केले आहे.आम्ही सामान्य माणसासाठी काम करत आहोत.नाईट लँडिंग सुविधा,नाशिक पुणे एक्स्प्रेस वे करत आहोत.मुंबई-नागपूर समृध्दी मार्ग केला आहे.आगामी साडेचार वर्षात केंद्र सरकारचा लाभ घ्यावा लागणार आहे.आम्ही राज्याला खड्ड्यात लोटून लाडकी बहिण योजना राबवत आहोत.आधी बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असे सांगून त्यांना फसवत आहेत.मात्र सरकारने त्यांची दिवाळी उत्तम साजरी केली आहे.काँगेसच्या काळात मध्येच पैसे खाऊन घेत होते.त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.ते पैसे चालू ठेवायचे असेल तर आगामी वीस तारखेला आ.आशुतोष काळे यांना मत द्या असे आवाहन केलं आहे.हा अजित पवार,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस यांचा वादा आहे.वीजबिल असेच मागच्यासह माफ केले आहे.त्याबद्दल अशीच अफवा पसरवत आहे.दूध दराचे अनुदान दिले आहे.तीन गॅस चे सिलेंडर चे पैसे थेट महिलांच्या खात्यावर वर्ग केले जाणार आहे.आमची प्रशासनावर पकड आहे पाच वेळा उपमुख्यमंत्री पद दिले आपले रेकॉर्ड कोणीच मोडू शकणार नाही.(हशा) कोपरगाव येथे काय टीका झाली ? आमचे काय चुकले ? पण मला आता त्याला किंमत देऊ इच्छित नाही.आम्ही शाहू,फुले,आंबेडकर विचारधारा सोडणार नाही.मुस्लिम समाजाला उर्दू शाळा,त्यांना इमारत,अन्य अनेक योजनांना सुद्धा निधी दिला आहे.आम्हाला सर्व समाजाच्या नेत्यांचा आदर आहे.महिलांना १०टक्के जागा दिल्या आहेत.आदिवासी,मागासवर्गीय यांना दिल्या आहेत.हे राज्य सर्व जाती धर्मांचे आहे.काही दिशाभूल करतील त्यावर विश्वास ठेवू नका.आ.काळे यांना निवडून द्या पुढील जबाबदारी आपल्यावर सोडा असे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक करताना आ.आशुतोष काळे हे म्हणाले की,”पश्चिमेचे पाणी पूर्वेस आणावे लागणार आहे.गोदावरी कालव्यांचे कमी पडलेले पाणी वाढवा,नगर मनमाड रस्ता,झगडे फाटा हा राष्ट्रीय महामार्ग बनावा, एम.आय.डी.सी.सुरू झाली आहे.त्याठिकाणी उद्योग वाढवावे त्यासाठी मदत मिळावी,४३३एकर जमीन आहे.त्याठिकाणी उद्योग आणावे,६३३कोटी रुपये शहराला दिले आहे.भुयारी गटार मंजूर झाली आहे.भूमिगत विद्युत वाहिन्या सुरू करण्यास मदत करावी,आपले सरकार आगामी काळात पुन्हा येणार आहे म्हणून ही कामे सांगत आहे.
माजी आ.कोल्हे यांनी माघार घेऊन मदत केली आहे.त्यांचे मी आभार मानत आहे.जास्त मतांनी निवडून देणार असल्याने आपल्याला निधी द्यावा लागणार आहे.

दरम्यान अजित पवार यांचे भाषण रंगत आले असताना त्यांना ठसका गेला असता त्यांना आ.आशुतोष काळे यांनी तत्काळ पाणी पाजले त्यावेळी अजित पवार यांनी कोटी करताना म्हणाले की,”तुमच्या आमदाराने मला पाणी पाजले आता मला त्यांना पाणी द्यावे लागणार आहे.त्यावेळी उपस्थितांत मोठा हशा पिकला होता.त्यावेळी शरद पवार यांच्या सभेचा गर्दीचा उच्चांक या सभेने मोडला असल्याचे दिसून आले आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष विजय वहाडणे बोलताना म्हणाले की,”आ.काळे हे नामदार होतील असे काम करा अशी मागणी करून मला कमी आणि जपून बोला,शाकाहारी बोला अशी सूचना केली असल्याची कोपरखीली मारून पुढे बोलताना ते म्हणाले की,”माझ्या काळात शहरातील आम्ही विकास कामे केली आहे.मतदारांचे सहाय्याने नगराध्यक्ष झालो त्यामुळे ही संधी मिळाली आहे.एक चर्चा जाणीवपूर्वक घडवली जाते मुस्लिम मते मिळणार आहे.मात्र ही मते कोणाच्या बापाची नाही.त्यांच्या सुखदुःखाच्या वेळी आम्ही उभे राहतो याचे सर्वांना जाणीव आहे.आपण केल्याने आगामी काळात नगरसेवकांना फार काही कामे राहिली नाही.आ.काळे यांच्या साहाय्याने कामे करून त्यांनी आगामी काळात आपण पुन्हा सामोरे जाणार असल्याचे सूतोवाच करून नगरपरिषदेचा अध्यक्ष पदाचे दावेदार असल्याचा दिवाळी बार उडवून दिला आहे.माजी खा.वहाडणे यांनी उजनी उपसा सिंचन योजना मंजूर केली आहे.मात्र काही विघातक लोक त्याचे फुकटचे श्रेय घेत असल्याचे सांगून घरचा आहेर दिला आहे.काही लोकांनी शरद पवारांचे व्यासपीठावर बोलावले असल्याचा गौप्यस्फोट केला व राहुल गांधी यांनी विर सावरकर यांचा अपमान केला त्यांची माफी मागितली पाहिजे असे आवाहन केले.मात्र ते तसे करणार नाही.स्व.बाळासाहेब ठाकरेंचा अपमान ते करत आहे.आमदार काळे हे उमदे नेतृत्व असे सांगून त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर यांनी केले तर आभार शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब रहाणे यांनी मानले आहे