जलसंधारण
…या तालुक्यातील जलसंधारणाच्या प्रस्तावांना मंजुरी देणार- आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
चालू वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील ३५० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलसंधारणाची कामे राबविणे आवश्यक आहे.त्यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जलसंधारणाच्या सर्व प्रस्तावांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आ.आशुतोष काळे यांना नुकतीच दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार,नाले खोलीकरण,पाणीपुरवठा प्रकल्पांमधील गाळ काढणे तसेच पाणी साठवणुकीच्या नवीन व्यवस्था निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.पाणी अडविणे आणि जिरविण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही 25 हजार कोटी रुपयांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या ‘सहकार विकास आघाडी’ने २१ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.या विजयानंतर आता सगळ्यांचे लक्ष बँकेच्या अध्यक्ष पदाकडे लागले असून,याचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याच्या बातम्या असून परवा रात्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपली पायधूळ कोपरगाव येथील ईशान्यगडाच्या नेत्यांच्या दारात झाडली असल्याचे वृत्त आहे.राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी त्याची काल दुपारी दोन वाजता पुनरावृत्ती केली असून त्यावेळी त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यावर आ.आशुतोष काळे यांची भेट घेतली असून त्यावेळी ही चर्चा झाली असल्याचे समजत आहे.
कोपरगाव मतदारसंघात दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण विभागाकडे विविध प्रस्ताव सादर केले असून,त्यांना तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली.या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजत आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी गाळमुक्त धरण,गाळयुक्त शिवार,नाले खोलीकरण,पाणीपुरवठा प्रकल्पांमधील गाळ काढणे तसेच पाणी साठवणुकीच्या नवीन व्यवस्था निर्माण करण्यावर शासनाचा भर आहे.पाणी अडविणे आणि जिरविण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही 25 हजार कोटी रुपयांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येणार आहेत.पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे,संचालक सूर्यभान कोळपे,डॉ.मच्छिंद्र बर्डे,शरदचंद्र पवार पतसंस्थेचे संचालक ज्ञानेश्वर हाळनोर, सुनील कोळपे,अंबादास धनगर,कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,सचिव बी.बी.सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ आदींसह कारखान्याचे अधिकारी व ऊसतोडणी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.



