जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचा साध्या पद्धतीने अर्ज दाखल

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

आगामी एकवीस ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी धांदल उडालेली असताना काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी अत्यंत साध्या पद्धतीने आपले नामनिर्देशनपत्र दाखल करून आपण सामान्य असून सामन्यासाठी काम करणार असल्याचे थेट कृतीतून लक्षवेधून घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या कोपरगाव नगरपरिषद निवडणूकित विजय वहाडणे यांनी प्रतिस्पर्धी कोल्हे गटाच्या उमेदवारांवर तब्बल साडे एकोणाविस हजाराचे मताधिक्य मिळवून राज्यात विक्रम स्थापित केलेला आहे.आता या निवडणुकीत ते कोणता विक्रम स्थापित करणार या कडे मतदारांचे लक्ष लागून आहे.त्यांनी तालुका व मतदारसंघ सर्वात आधी पिंजून काढलेला आहे.व त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.

राज्य विधान सभेची निवडणूक आगामी एकवीस ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.राज्यात अद्याप युती होणार कि नाही या बाबत संभ्रम असताना कोपरगावात मात्र आपण कोणत्या पक्षात कोण आहे याचा काही अद्याप थांगपत्ता लागण्यास तयार नाही.तालुक्यातील प्रमुख व पारंपरिक विरोधक गणले गेलेले माजी मंत्री शंकरराव कोल्हे व माजी आ. अशोक काळे या बलाढ्य नेत्यांचा अद्याप कोणता झेंडा व कोणती काठी याचा कुठलाही थांगपत्ता लागत नाही.नामनिर्देशन पत्र भरण्याचा आज चौथा दिवस असताना या दिवशी अर्जाची संख्या वाढेल असा अंदाज असताना काल सकाळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपले सहकारी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे,नामदेवराव जाधव,नरेंद्र मोदी मंचचे तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,सचिव राजेंद्र खिलारी,वसंत जाधव आदी समवेत जाऊन आपले नामनिर्देशन पत्र सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे यांचेकडे सुपूर्त केले आहे.त्यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे हि उपस्थित होते.

नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या कोपरगाव नगरपरिषद निवडणूकित विजय वहाडणे यांनी प्रतिस्पर्धी कोल्हे गटाच्या उमेदवारांवर तब्बल साडे एकोणाविस हजाराचे मताधिक्य मिळवून राज्यात विक्रम स्थापित केलेला आहे.आता या निवडणुकीत ते कोणता विक्रम स्थापित करणार या कडे मतदारांचे लक्ष लागून आहे.त्यांनी तालुका व मतदारसंघ सर्वात आधी पिंजून काढलेला आहे.व त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे.अद्याप तरी त्यांचीवाटचाल हि अपक्ष म्हणूनच सुरु आहे.भाजप व सेनेची अद्याप युती जाहीर नाही व कोपरगावची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार हेही निश्चित नाही.त्यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे.त्यासाठी त्यांना उजवा कौल मिळालेला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मात्र यदाकदाचित उमेदवारी भाजपकडून मिळाली नाहीच तर त्यांनी अपक्ष दंड थोपटलेले आहेच.त्यांच्या उमेदवारीचा सत्ताधारी गटाने चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close