जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

निवडणूक पथकाने भोजडेत केली जप्त बारा हजार रुपयांची अवैध दारू !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगांव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत निवडणूक पथकाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकाजवळ सुमारे बारा हजार रुपयांची अवैध देशी दारुची वहातुक करत असतांना कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

भारत निवडणूक आयोग निर्देशित भरारी पथकाला कोपरगांव तालुक्यातील भोजडे बसस्थानकाजवळ एम.एच.११ ए.डब्ल्यू.२३७८ या क्रमांकाच्या सिल्वर रंगाची टाटा ईंडिगो गाडीत सहा खोक्यांमध्ये सुमारे १२ हजार रुपये किमतीची देशीदारु आढळून आली आहे.सदर वाहनात किरण पुंडलिक धोक्रट रा.शिंगणापूर ता. कोपरगाव हा ईसम आढळून आला आहे.या ईसमाची चौकशी करुन पथकाने दारु वाहतूक परवाना व ईतर कागदपत्रे मागितली असता कुठलाही कागदपत्रे आढळून आली नाही.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,भारत निवडणूक आयोग निर्देशित भरारी पथकाला कोपरगांव तालुक्यातील भोजडे बसस्थानकाजवळ एम.एच.११ ए.डब्ल्यू.२३७८ या क्रमांकाच्या सिल्वर रंगाची टाटा ईंडिगो गाडीत सहा खोक्यांमध्ये सुमारे १२ हजार रुपये किमतीची देशीदारु आढळून आली आहे.सदर वाहनात किरण पुंडलिक धोक्रट रा.शिंगणापूर ता. कोपरगाव हा ईसम आढळून आला आहे.या ईसमाची चौकशी करुन पथकाने दारु वाहतूक परवाना व ईतर कागदपत्रे मागितली असता कुठलाही कागदपत्रे आढळून आली नाही.

या पथकाचे प्रमुख दतात्रय रणमाळ,सहाय्यक फौजदार रमेश भालेराव,चांद सय्यद यांनी कारवाई केली आहे.सदर वाहन जप्त करण्यात आले आहे.व सदर प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगांव तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.२१९ कोपरगांव विधानसभा मतदारसंघात अवैधरित्या मतदारांना प्रभावित करतील अशा कोणत्याही गोष्टींचे पुरवठा करणे, वाहतूक आणि वाटप यास प्रतिबंध करण्यात आला आहे.सदर कृत्य करतांना व्यक्ती अथवा समुह आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असा इशारा या आधीच निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close