गुन्हे विषयक
“त्या”आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरानाजीक असलेल्या नगर-मनमाड या राज्यमार्गावरील कातकडे पॆट्रोल पंपासमोर एकवीस नोव्हेम्बरच्या रात्री बाराच्या सुमारास महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीचा (क्रं.एम.एच.२३ ए. एस.७४५८) व एक एफ.झेड.दुचाकी बिगर क्रमांकाची या वाहनांचा वापर करत व त्यात लोखंडी गज,लाकडी दांडके,दोन लोखंडी कोयते आदींचा वापर करून दारोड्याच्या तयारीत असलेले महेश भाऊसाहेब मंचरे (वय-२४) या सह पाच आरोपिंना कोपरगाव येथील प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली आहे.
यातील आरोपी महेश मंचरे याचे विरोधात कोपरगाव,राहाता,संगमनेर,लोणी आदी ठिकाणी सहा गुन्हे दाखल आहे.तर राहुल बुधनव याचे विरुद्ध फुलंब्री,शिवाजीनगर बीड,गेवराई आदी ठिकाणी तीन गुन्हे तर गफूर बागवान कोपरगाव याचे विरुद्ध कोपरगाव शहरात तीन गुन्हे दाखल झालेले आहे.हे सर्व आरोपी कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते-संजय सातव,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत एकवीस नोव्हेम्बर रोजी रात्रीच्या सुमारास १०.५० वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना दरोड्याच्या तयारीत असलेले आरोपी आपल्या महिंद्रा स्कॉर्पिओ जीप व एक विना क्रमांकाच्या यामाहा दुचाकीसह संशयित रित्या आढळून आले होते.पोलिसानी आपला मोर्चा तिकडे वळवला असता हा चोरट्यांची घाबरगुंडी उडाली त्यांची पोलिसानीं धरपकड केली आहे.त्यात कारागृहात शिक्षा भोगत असताना ओळख झालेले आरोपी महेश भाऊसाहेब मंचरे,रा.गोटुंबे आखाडा,ता.राहुरी,सुरज लक्ष्मण वडमारे, (वय-२२) रा.आहेर वायगाव ता.बीड,जि.गेवराई राहुल कुंडलिक बुधनव,(वय-२२) रा.खांमगाव ता.जि. बीड,भारत चितळकर,(पूर्ण नाव माहित नाही)रा.गुंथेगाव ता.गेवराई,जि. बीड, गफूर गनिभाई बागवान रा.निंभारा मैदान,कोपरगाव आदींना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली व त्यांच्याकडील एक महिंद्रा स्कॉर्पिओ जीप,यामाहा कंपनीची एक एफ.झेड.दुचाकी (चेसी क्रमांक एम.१२ सी.जे.९ डी.२००६९७२) तर जीप गाडीत एक लोखंडी गज ६६ से.मी.लांबीचा एक लाकडी दांडके,एक ६० से.मी.लांबीचा पुढील बाजूस वाकडा असलेला गज,एक लोखंडी कोयता ५० से.मी.लांबीचा,दुसरा कोयता ३१ से.मी.लांबीचा राहुल बुधनव याचे ताब्यातील व तीन विवो कंपनीचे तीन भ्रमणध्वनी आदी ऐवज जप्त केला होता.तर त्यातील एक आरोपी राहुल कुंडलिक बुधनव व गफूर गनिभाई बागवान हे फरार झाले होते मात्र त्यातील गफूर बागवान याला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले होते.त्यानां अटक करून काल दुपारी कोपरगाव येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने २४ नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे.
दरम्यान यातील आरोपी महेश मंचरे याचे विरोधात कोपरगाव,राहाता,संगमनेर,लोणी आदी ठिकाणी सहा गुन्हे दाखल आहे.तर राहुल बुधनव याचे विरुद्ध फुलंब्री,शिवाजीनगर बीड,गेवराई आदी ठिकाणी तीन गुन्हे तर गफूर बागवान कोपरगाव याचे विरुद्ध कोपरगाव शहरात तीन गुन्हे दाखल झालेले आहे.हे सर्व आरोपी कोरोनामुळे पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते.मात्र या संधीचा त्यांनी असा दुरूपयोग केल्याचे धक्कादायक रित्या पोलिसांना आढळून आले आहे.
याबाबत या गुन्हेगारांना काल दुपारी माध्यम प्रतिनिधींसमोर हजर करून त्याबद्दल माहिती दिली आहे.त्यावेळी शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे,पोलिस उप निरीक्षक भारत नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.