कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुका पोलीस ठाणे,पोलीस निरीक्षक नियुक्ती जाहीर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज आस्थापनाची तातडीची बैठक घेऊन जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या असून श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकदी विनंती बदली झाली आहे.जाधव हे याधीही कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राहिलेले आहे.ते कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.त्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे त्यांच्या नियुक्तीचे कोपरगाव तालुक्यात स्वागत होत आहे.
पो.नि.दौलतराव जाधव या पूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी होते.मात्र भाजपच्या काही राजकीय नेत्यांना त्यांची अडचण झाल्याने त्यांची अवघ्या दीड वर्षात श्रीगोंदा या ठिकाणी बदली करण्यात आली होती.तेथेही त्यांनी आपल्या कामाची चमक दाखवली होती.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व त्यांचा वाद चांगलाच रंगला होता मात्र जिल्हा परिषद अध्यक्षास मात्र त्या वादात माघार घ्यावी लागली होती.हि दोन माहिण्यापूर्वीची ताजी घटना आहे
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मांगावकर यांची नुकतीच बदली झाली असताना त्यांच्या नंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचीही नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी निवड झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या होत्या.मात्र त्यानंतर गुन्हेगारांनी आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला होता.व गुन्हे वाढण्यास प्रारंभ केला होता.आता पोलीस निरीक्षक पदी जाधव यांची नियुक्ती झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.जाधव यांच्या जागी शेवंगावचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पो.नि.दौलतराव जाधव या पूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी होते.मात्र भाजपच्या काही राजकीय नेत्यांना त्यांची अडचण झाल्याने त्यांची अवघ्या दीड वर्षात श्रीगोंदा या ठिकाणी बदली करण्यात आली होती.तेथेही त्यांनी आपल्या कामाची चमक दाखवली होती.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व त्यांचा वाद चांगलाच रंगला होता मात्र जिल्हा परिषद अध्यक्षास मात्र त्या वादात माघार घ्यावी लागली होती.हि दोन माहिण्यापूर्वीची ताजी घटना आहे.बहुदा त्यांना कोपरगावची माहिती असल्यानेच त्यांनीं हि विनंती बदली करून घेतली असल्याचा अंदाज आहे.त्यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.