जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीत येणाऱ्यांनी पालख्या आणण्याचे टाळा-संस्थानचे आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्‍य शासनाच्‍या आदेशाने दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले असून कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) चा प्रादुर्भावामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता येतानी साईभक्‍तांनी ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. तसेच पालखी घेऊन येणा-या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी घेऊन येण्‍याचे टाळावे असे आवाहन साई संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्‍यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते.याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये.तसेच पालखी मंडळाचे पदाधिका-यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे-साई बाबा संस्थान शिर्डी.

जगभरात,देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना साथीच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने जवळपास सात महिने टाळेबंदी जाहीर करण्‍यात आली होती.दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते.दिनांक १४ नोव्‍हेंबर रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे.अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे.त्‍यामुळे गुरुवार शनिवार,रविवार व सलगसुट्टयांच्‍या कालावधीत गर्दी होवु नये म्‍हणुन साईभक्‍तांनी शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येतानी संस्‍थानच्‍या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे.तसेच दर गुरुवारी शिर्डी व पंचक्रोशितील नियमीत येणा-या भाविकांनी श्रीं चे दर्शनासाठी मोफत बायोमॅट्रीक पास घेवुन मंदिरात प्रवेश करावा.मुखपट्यांचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना,१० वर्षाखालील मुलांना,गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.या शिवाय मंदिरात फुलं,हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे.
तरी कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्‍यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते.याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये.तसेच पालखी मंडळाचे पदाधिका-यांनी पदयात्रींसह पालखी घेऊन शिर्डी येथे येण्‍याचे टाळावे असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.साईभक्त याचे किती पालन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close