गुन्हे विषयक
अवैध वाळू उपसा,दोघांवर गुन्हा,तर 5.5 लाखांचा ऐवज जप्त !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीतील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास शासनाचा मज्जाव असतानाही आरोपी रिंकु सतिष माळी,(वय-२३ वर्षे ) तेजस गुरसळ दोघे रा.डाऊच खुर्द ता.कोपरगाव यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गोदावरी नदीपात्रातील शासकिय मालकोचे गौण खनिज वाळूचे उत्खनन करुन त्याची विना नंबरचे ट्रक्टर व ट्रॉली मध्ये अनाधिकृत चोरटी वाहतुक करतांना नुकताच मिळून आला आहे.यातील आरोपी रिंकू माळी याला अटक करून ताब्यात घेतलेला आहे.त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या घटकांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत नैऋत्येस साधारण पाच कि.मी.अंतरावर डाऊच खुर्द शिवारात उघडकीस आली आहे.यातील आरोपी रिंकु सतिष माळी,(वय-२३ वर्षे ) तेजस गुरसळ दोघे रा.डाऊच खुर्द ता.कोपरगाव यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गोदावरी नदीपात्रातील शासकिय मालकोचे गौण खनिज वाळूचे उत्खनन करुन त्याची विना नंबरचे ट्रक्टर व ट्रॉली मध्ये अनाधिकृत चोरटी वाहतुक करतांना दिनांक 05 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मिळून आला आहे.
गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा हा पर्यावरण,नदीपात्रांचे अस्तित्व आणि शासनाच्या महसुलासाठी एक गंभीर चिंतेचा विषय बनला आहे.नदीपात्रांमधून यंत्रांद्वारे होणाऱ्या अनियंत्रित उत्खननामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून,यामुळे ग्रामीण व शहरी भागांत पाण्याचे दुर्भिक्ष आणि शेतीचे मोठे नुकसान होत आहे.नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा येतो आणि काठ खचत असताना दिसून येत आहे.या शिवाय नदी पात्रातील वाळूचे थर नष्ट झाल्याने भूजल साठवणूक क्षमता दिवसेंदिवस कमी होत असताना दिसून येत आहे.परिणामी नदीकाठच्या सुपीक जमिनी खचून शेतजमीन नष्ट होण्याचा धोका वाढत चालला आहे.पाण्यातील जलचर आणि सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त होत असून त्याचे दूरगामी परिणाम होत आहे.महसूल,पोलिस अधिकारी आणि वाळू चोर यांच्यात अनिष्ट युती या पर्यावरण साखळी धोक्यात आणताना दिसून येत आहे.नदीकाठच्या रस्त्यांची वाट लागली हे नव्याने सांगण्याची गरज उरलेली नाही.तरीही हे वाळूचोर थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत नैऋत्येस साधारण पाच कि.मी.अंतरावर डाऊच खुर्द शिवारात उघडकीस आली आहे.यातील आरोपी रिंकु सतिष माळी,(वय-२३ वर्षे ) तेजस गुरसळ दोघे रा.डाऊच खुर्द ता.कोपरगाव यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी गोदावरी नदीपात्रातील शासकिय मालकोचे गौण खनिज वाळूचे उत्खनन करुन त्याची विना नंबरचे ट्रक्टर व ट्रॉली मध्ये अनाधिकृत चोरटी वाहतुक करतांना दिनांक 05 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मिळून आला आहे.यातील आरोपी रिंकू माळी याला अटक करून ताब्यात घेतलेला आहे.त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या घटकांत खळबळ उडाली आहे.या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस निरिक्षक उद्धव डमाळे यांनी घटनासाठी धाव घेऊन आरोपींचे विना क्रमांकाचा स्वराज 744 एफ.इ.ट्रॅक्टर,त्याचा चेसिस नंबर-४७३४६०१००० व इंजिन नंबर ओ.एस.टी.डी.४०६०६००९००० असा असलेला त्यास विना नंबरची लाल रंगाची ट्रॉली त्यामध्ये एक ब्रास वाळु भरलेली असलेली असा एकूण 05 लाख 05 हजारांचा अवैज जप्त केला असून आरोपीं रिंकू माळी यास अटक केली आहे.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल गणेश वशिष्ठ काकडे यांनी गुन्हा नोंद क्रमांक – ४२६/२०२६ भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ३०३(२),३(५) सह प.स.अ.-१९८६ चे कलम ३,१५ प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल किशोर जाधव हे करत आहेत.



