गुन्हे विषयक
शहर पोलिस ठाण्यात,’पोस्को’ गुन्हा दाखल,परिसरात खळबळ!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आरोपीं नरेंद्र घुले याने एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीचा पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याने टपोरेगिरी करणाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘पोक्सो’ हा बालकांच्या संरक्षणासाठी असलेला एक कठोर कायदा आहे.१८ वर्षांखालील मुला-मुलींचे लैंगिक शोषण आणि छळ यापासून रक्षण करणे,हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.सरकारने कठोर कायदे करूनही बऱ्याच वेळा हुड आणि टपोरेगिरी करणाऱ्यांना त्याचा धाक रहात नाही.अशीच घटना कोपरगाव शहर पोलिस ठाणे परिसरात घडली आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.
अठरा वर्षांखालील कोणत्याही बालकासोबत (मुलगा किंवा मुलगी) परस्पर संमतीने किंवा बळजबरीने केलेले लैंगिक कृत्य,लैंगिक अत्याचार,अश्लील हावभाव,किंवा बाल लैंगिक शोषणाशी संबंधित बाबी या कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे मानले जातात.’पोक्सो’ हा बालकांच्या संरक्षणासाठी असलेला एक कठोर कायदा आहे.१८ वर्षांखालील मुला-मुलींचे लैंगिक शोषण आणि छळ यापासून रक्षण करणे,हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.सरकारने कठोर कायदे करूनही बऱ्याच वेळा हुड आणि टपोरेगिरी करणाऱ्यांना त्याचा धाक रहात नाही.अशीच घटना कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात नुकतीच घडली आहे.यातील अल्पवयीन मुलगी ही महाविद्यालयीन शिक्षण घेत असून.सुट्टीच्या काळात आपल्या आईवडिलांना मदत करण्यासाठी ती अन्य कामे करत असल्याचे समजते.त्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने तिच्या येण्याजण्याच्या रस्त्यावर लक्ष ठेवून तिचा वारंवार पाठलाग करून तिला त्रास दिल्याचे उघड झाले आहे.तिने बरेच दिवस हा त्रास सहन केला.मात्र नुकत्याच झालेल्या घटनेत आरोपीने सर्व मर्यादा ओलांडून रस्त्याने घरी जात असताना तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते.मात्र तिने याबाबत घरी काहीही सांगितले नाही.मात्र ती दहशतीने घाबरली होती.याची घरात असलेल्या अन्य सदस्यांनी दखल घेतल्यावर ही गंभीर बाब उघड झाली.त्यावेळी कुटुंबातील आई,वडील आणि अन्य सदस्यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली व सदर प्रकार पोलिस अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला आहे.
त्यात तिने म्हटले आहे की,”आरोपी घुले याने माझा वारंवार पाठलाग केला व माझा हात धरून मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून, तु,”माझ्याशी बोलत जा,तु,”जर माझयाशी बोलली नाहीतर तुला पाहुन घेईन” असा दम दिला असल्याचे म्हटले आहे.
त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आरोपी घुले विरुद्ध बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ कलम १२,भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७८ भारतीय न्याय संहिता (बी एन एस),२०२३ कलम ७८,७९,३५१,(२) अन्वये आपल्या दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पुढील तपास पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती हे करीत आहेत.



