जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पन्नास हजारांवर डल्ला,चोरटा चलचित्रणात कैद!

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात आणि तालुक्यात सातत्याने गुन्ह्यांचा आलेख वाढत असताना काल संवत्सर,रामवाडी येथील सुभाष नेवसे यांचा रामनवमी निमित्त जमलेली वर्गणी भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत भरणा करत असताना तेथील एका चोरट्या तरुणाने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधत त्यांच्या खाली ठेवलेल्या पिशवीतील
पन्नास हजार रुपयांचा बंडल घेऊन पोबारा केला आहे.त्यामुळे संवत्सर आणि परिसरातील ग्रामस्थानी संताप व्यक्त केला आहे.दरम्यान या चोरीचे चलचित्रणं बँकेने उपलब्ध करून दिल्याने सदर चोरट्याला पकडण्याचे आव्हान शहर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

डोक्याला उपरणे बांधलेले व स्लिप भरताना सुभाष नेवगे व त्यांच्या मागे खाली वाकलेला व पिशवीतून बंडल काढताना चोरटा दिसत आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सोमैया महाविद्यालयांच्या दौऱ्यात सहभागी असल्याची माहिती हाती आली आहे तर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बबन तमनर यांचेशी संपर्क साधला असता,”त्यांनी याबाबत गुन्हा दाखल असून त्याचा तपास हे.कॉन्स्टेबल दिपक रोकडे यांचेकडे असल्याची माहिती दिली आहे.

 

  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील गुन्ह्याचा आलेख सारखा वाढत असताना दिसत आहे.त्यामुळे सामान्य माणसांचे जगणे अवघड होत चालले आहे.अवैध वाळू उपशाच्या प्रश्नाने तर नेते आणि प्रशासनाच्या डोक्यावरून पाणी फिरले असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे याबाबत कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आशुतोष काळे हे अलीकडील काळात सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत आहे.मात्र तरीही प्रशासन जागचे हलायला तयार असल्याचे दिसत नाही.त्यामुळे संतप्त होऊन आ.काळे यांनी या प्रश्नावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात यावर आवाज उठवला असल्याचे दिसून येत आहे.

पैसे घेऊन खिशात घालत पोबारा करताना बँकेबाहेर पळून जात असलेला चोरटा.

  कालच सुभद्रानगर उपनगर परिसरात कत्ती टोळीनंतर
चोरट्यांनी घरी कोणी नाही अशा दोन घरांच्या घरफोड्या करून पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे.ते कमी की काय संवत्सर,रामवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष नेवसे हे रामनवमी उत्सव जवळ आल्याने गावातील ग्रामस्थांकडून वर्गणी गोळा करून त्याचा भरणा कोपरगाव येथील स्टेट बँकेच्या अटलबिहारी वाजपेयी मार्गावरील मुख्य शाखेत करत होते.त्यासाठी ते त्या भरण्याची स्लिप काउंटरवर भरत असताना त्यांनी आपली पैशाची पिशवी खाली ठेवली होती.याच संधीचा अचूक फायदा उठवत एक निळ्या पांढऱ्या चौकटीचा शर्ट असलेल्या तरुणाने त्यांची नजर चुकवून त्यांच्या मोठ्या भरण्यातील ५०० रुपयांच्या नोटांचा बंडल असलेल्या पिशवीतून एक ५० हजार रुपयांचा एक बंडल अलगतपणें उचलून त्या ठिकाणी कोणाचे लक्ष नाही ही संधी साधत त्या ठिकाणाहून पोबारा केला आहे.

पांढऱ्या वर्तुळात चोरी करणारा हाच तो भामटा तरुण.

   दरम्यान सदरची रक्कम काढताना आणि तो बँकेच्या बाहेर पडल्यावर पश्चिम दिशेने घाईघाईने निघून जाताना दिसत असल्याचे बँकेने उपलब्ध करून दिलेल्या चलचित्रणात उघड झाले आहे.त्यामुळे हा भामटा कोपरगाव शहर आणि परिसरातील असल्याचे समजले जात आहे.त्यामुळे त्याला पकडण्याचे आव्हान कोपरगाव शहर पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.


    दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सोमैया महाविद्यालयांच्या दौऱ्यात सहभागी असल्याची माहिती हाती आली आहे तर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बबन तमनर यांचेशी संपर्क साधला असता,”त्यांनी याबाबत गुन्हा दाखल असून त्याचा तपास हे.कॉन्स्टेबल दिपक रोकडे यांचेकडे असल्याची माहिती दिली आहे.मात्र चोरटा पकडला की नाही ही माहिती त्यांना देता आली नाही.तर रोकडे यांचेशी संपर्क स्थापित होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close