जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक,एक ठार,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात अज्ञात वाहनाने बजाज डिस्कव्हर या दुचाकीस क्रं.एम.एच.२० सी.ई.१२८३) हिस दिलेल्या धडकेत भगाव ता.वैजापूर येथील दुचाकी स्वार शरद प्रकाश जगताप (वय-३९) हे ठार झाले आहे.या प्रकरणी त्यांचा भाऊ रवी प्रकाश जगताप यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने या महामार्गावर वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्या शिवाय समृद्धी महामार्गावर अपघात जास्त होत असल्याने अनेकांना या जुन्या महामार्गाची आठवण होत असल्याने या महामार्गावर अवजड वाहनाची मोठी वर्दळ मोठी असते.त्यामुळे अनेक अपघात वाढले आहे.त्यामुळे त्यासाठी समृद्धी मार्गावर अपघात प्रतिबंधक कार्यवाही होणे गरजेचे बनले आहे.असाच अपघात नुकताच धोत्रे शिवारात घडला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने या महामार्गावर वहाने भरधाव वेगाने जात असतात.त्या शिवाय समृद्धी महामार्गावर अपघात जास्त होत असल्याने अनेकांना या जुन्या महामार्गाची आठवण होत असल्याने या महामार्गावर अवजड वाहनाची मोठी वर्दळ मोठी असते.त्यामुळे अनेक अपघात वाढले आहे.त्यामुळे त्यासाठी समृद्धी मार्गावर अपघात प्रतिबंधक कार्यवाही होणे गरजेचे बनले आहे.मात्र त्या पातळीवर कारवाही होत नसल्याने या जुन्या मुंबई-नागपूर या महामार्गावर वहातूक वाढली असल्याने त्यावर उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.अशीच घटना दि.२० जून रोजी सायंकाळी ०५ वाजता घडली आहे.यातील फिर्यादीचे भाऊ मयत इसम शरद जगताप हे आपल्या गावाकडे आपल्या बजाज डिस्कव्हर वरून जात असताना त्यानां अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली त्यात त्यांचे निधन झाले आहे.यात त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातानंतर अज्ञात वाहन चालक हा आपले वहान घेऊन फरार झाला आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अगोदर अकस्मात मृत्यूची क्रं.४३/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली होती.मात्र नंतर मयताचा भाऊ रवी जगताप यांचे फिर्यादी वरून या प्रकरणी आज दुपारी ४.२९ वाजता कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी रवी प्रकाश जगताप यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले यांचेसह पोलीस हे.कॉ.राजेंद्र म्हस्के यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१४६/२०२३ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मो.वा.का.कलम १८४,१३४(अ)(ब)१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.म्हस्के हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close