जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव नगरपरिषदेतर्फे स्वच्छता जागृती फेरी संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद मार्फत जागतिक शून्य कचरा दिवस व स्वच्छता उत्सव-२०२३ या निमित्ताने जनजागृती साठी कोपरगाव नगरपरिषदे मार्फत स्वच्छता जागृती फेरी आणि स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृध्दींगत करण्यासाठी शहरामध्ये ७ ते ३० मार्च या कालावधीत स्वच्छोत्सव-२०२३ अभियान साजरा करण्यात येत आहे. शहरामध्ये,’विन्स अवार्ड’ स्वच्छता जागृती फेरी व स्वच्छता शपथ आणि जागतिक शुन्य कचरा आदी विविध उपक्रमाद्वारे स्वच्छता उत्सव-२०२३ अभियान कोपरगाव शहरात साजरे करण्यात येत आहे.

सदर प्रसंगी सकाळी ठीक साडे दहा वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी,आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय आवारात स्वच्छता शपत घेण्यात आली.त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी स्वच्छता कर्मचारी यांच्या समवेत कोपरगाव शहरातून स्वच्छता जागृती फेरी काढण्यात आली.शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छते विषयी जनजागृती करण्याचा उद्देश होता.तसेच दैनदिन कचरा हा घंटा गाडी मध्ये देतांना तो विलगीकरण केल्यास संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होईल व त्या प्रक्रीये वरचा खर्च कमी होऊ शकतो.तसेच नागरिकांनी एकल वापर प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा करण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

या जागृती फेरीचा आणखी महत्वाचा उद्देश म्हणजे शहरातील महिलांनी शहर स्वच्छते मध्ये उस्फुर्त सहभाग घ्यावा आणि आपले शहर भावीकाळात कचरा मुक्त व्हावे या उद्देशाने शासना मार्फत स्वच्छता उत्सव-२०२३ अंतर्गत,’विन्स अवार्ड-२०२३’हि स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.या स्पर्धेत भाग घेणेसाठी शहरातील महिलांनी एकत्रित अथवा वैयक्तिक स्वच्छता उपक्रमात सहभाग घेतला असावा.शहर स्वच्छतेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल उपलब्ध दस्त ऐवजासह नगरपरिषद कार्यालयात संगणक विभागात उपलब्ध करून दिलेले मोफत अर्ज भरून दिनांक ०५ एप्रिल २०२३ अखेर नगरपरिषद कार्यालयात सादर करणे बंधन कारक आहे.या उपक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी गोसावी यांनी केले आहे.

सदर उपक्रम यशस्वीततेसाठी कोपरगाव नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,स्वच्छता निरीक्षक सुनिल आरण,नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे,शहर समन्वयक स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) प्रविण मोरे,तसेच नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी शेवटी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close