धार्मिक
शिर्डीत साईबाबांना चांदीचे ताट अर्पण

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात.तसंच आपल्या इच्छेनुसार साईंच्या झोळीत देणगी टाकतात.कोणी पैसे तर कोणी सोनं,चांदी किंवा हिरे हे साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतात.आज गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने शिर्डी येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती प्रियांशी अक्षय खुल्लर यांनी श्री साईचरणी ७० हजार २५० रुपये किंमतीचे ७०९.६०० ग्रॅम वजनाचे चांदीचे आकर्षक ताट अर्पण केले आहे.

या दानशूर साई भक्त परिवाराचा साई संस्थानचे अधिकारी यांनी शाल,साई मूर्ती देऊन सत्कार केला आहे.तसंच भाविकाने देणगी म्हणून आणलेला चांदीचे ताट साईबाबांच्या धुपआरती आधी साईबाबांच्या मूर्तीला अर्पण करण्यात आले आहे. त्यांच्या या दानशुरपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.