जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

डिझल चोरीतील आरोपी जेरबंद,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण हद्दीतील नगर-मनमाड मार्गावरील उभ्या असलेल्या कंटेनर मधून अज्ञात चोरट्यांनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी सुमारे ११ हजार १६० रुपयांचे डिझल चोरून फरार झाले होते.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या प्रकरणी शहर पोलिसांनी जेऊर कुंभारी हद्दीतील चोरट्यांना जरबंद केले असून त्याच्याकडून अजून काही चोऱ्या उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

डिझल चोरीतील आरोपी रविराज किशोर देसले,(वय-२६)रा.निमगाववाडी,ता.राहाता,विक्की मच्छीन्द्र गायकवाड,(वय-२७),तान्हाजी किसान वायदंडे (वय-६०),रा.गणेश नगर,साहेलअली इम्तियाज सय्यद,(वय-३५)रा.जाजमऊ,शितला बाजार कानपुर,ह.मु.शिर्डी आदींना जेरबंद केले असून त्यांच्याकडून सुमारे ९ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात दुचाकी आणि चार चाकी वाहन चोरीच्या व भुरट्या चोऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस त्या कमी की काय दागिने चोऱ्याही लक्षणीयरित्या वाढल्या आहेत.त्यामुळे तालुका आणि शहर पोलिसांपुढे या चोरट्याना शोधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.त्यातच दि.२९ मार्च रोजी उत्तर प्रदेश मधील बनपुकरा ता.शिराथु जि.कौसंबी येथील फिर्यादी चालक रामकुमार शिवप्रसाद पटेल यांनी नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला व समृद्धी महामार्गाच्या जवळ असलेल्या जागी कंटेनर (क्रं.एम.एच.०४ एफ.यू.०३५१) उभा करून ठेवला असता त्यातील सुमारे ११ हजार १६० रुपयांचे डिझल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.त्याबाबत त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.१४८/२०२३ भा.द.वि.कलम अन्वये दाखल केला होंता.

त्या बाबत कोपरगाव शहर पोलीस तपास करत असताना त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर लागली की,समृद्धी महामार्गाजवळ जेऊर कुंभारी हद्दीत डिझेल चोरी करणारे काही संशयित इसम उभे आहेत.त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पो.हे.कॉ.राजू पुंड,के.ए.जाधव,पो.कॉ.संभाजी शिंदे,महेश फड,वाय.बी.सुंबे,जी.पी.थोरात,राम खारतोडे,गणेश काकडे,आदींनी सापळा लावला होता.त्यानां पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांची नावे विचारली असता त्यांनी रविराज किशोर देसले,(वय-२६)रा.निमगाववाडी,ता.राहाता,विक्की मच्छीन्द्र गायकवाड,(वय-२७),तान्हाजी किसान वायदंडे (वय-६०),रा.गणेश नगर,साहेलअली इम्तियाज सय्यद,(वय-३५)रा.जाजमऊ,शितला बाजार कानपुर,ह.मु.शिर्डी आदींना जेरबंद केले आहे.

सदर गुंह्यातील मुद्देमाल आरोपीनी रामपूरवाडी रोड शिवारातील एका पत्र्याचे हॉटेल मध्ये दडवून ठेवलेला तीन प्लस्टिकच्या ड्रममध्ये ०९ हजार ७६५ रुपयांचे १०५ लिटर डिझल मुद्देमाल काढून दिला आहे.या प्रकरणी शहर पोलिसांचे शहरात कौतुक होत आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी व सहकाऱ्यांनी आदींनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी आरोपीना जेरबंद करून मुद्देमाल जप्त केला आहे.पुढील तपास पोलिस ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.जाधव हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close