जाहिरात-9423439946
आरोग्य

तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता द्या-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता द्या-मागणी
कोपरगाव विधानसभा तालुक्यातील तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता देण्यात यावी यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे.

“तीळवणी आणि परिसरातील ग्रामस्थांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय जवळपास २० किलोमीटरच्या अंतरावर आहे.त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव

कोपरगाव मतदार संघातील तीळवणी येथे आ. काळे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळविली आहे.मात्र जिल्हा नियोजन समितीची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर मान्यता मिळणे आवश्यक असून त्यांनतरच निधीची तरतूद होणार आहे. त्यामुळे आ.काळे यांनी आरोग्य मंत्री टोपे यांची भेट घेवून त्यांना लवकरात लवकर तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता द्यावी यासाठी प्रयत्न केले आहे.

पूर्व भागातील नागरिकांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालय जवळपास २० किलोमीटरच्या अंतरावर आहे.त्यामुळे तातडीने उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे.तिळवणी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तिळवणीसह कासली,शिरसगाव,आपेगाव,उक्कडगाव,सावळगाव, गोधेगाव,घोयेगाव आदी कोपरगाव तालुक्यातील गावांसह वैजापूर तालुक्यातील नजीकच्या गावातील नागरिकांचे आरोग्य आबाधित राहण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यासाठी तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता मिळावी अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली. सदर मागणीला प्रतिसाद देत लवकरच तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही आरोग्य मंत्री टोपे यांनी आ.काळेंना शेवटी दिली आहे.

सदर मागणीला प्रतिसाद देत लवकरच तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्रालय स्तरावर मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही आरोग्य मंत्री टोपे यांनी आ.काळेंना शेवटी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close