जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील..ते दुहेरी हत्याकांड,अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण वीस कि.मी.अंतरावर असलेल्या आपेगाव ग्रामपंचायत हद्दीत पूर्वेस गावापासून सोमवार दि.३० रात्रीच्या सुमारास रहिवासी असलेले शेतकरी दत्तात्रय गंगाधर भुजाडे (वय-७५) व त्यांची पत्नी राधाबाई दत्तात्रय भुजाडे (वय-६०) हे आपल्या घराच्या छतावर झोपलेले असताना अज्ञात आरोपींनीं त्यांना लोखंडी गजाच्या सहाय्याने रात्रीच मारून टाकले असून या ठिकाणी आज नगर येथील जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,घटनास्थळी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, नगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,कोपरगाव पोलीस ठाण्याचें पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,व त्यांचे पोलीस पथक आदींनी भेट दिली असून तपासाची चक्रे फिरवली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस हद्दीत घारी ग्रामपंचायत हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून टाकून दिलेले असताना व त्यातील आरोपी अद्याप मोकाट असताना या दुहेरी हत्याकांडाच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस तीळवणी गावाच्या ईशान्य दिशेस साधारण अडीच कि.मी.अंतरावर आपेगाव हे खेडे आहे.गावाच्या पूर्वेस साधारण दीड कि.मी.अंतरावर आपल्या शेतात घर करून रहात असलेले शेतकरी दत्तात्रय भुजाडे व त्यांची पत्नी हे राधाबाई भुजाडे दोघे पक्क्या इमारतीत राहत होते.त्यांना दोन मुले असून ते उच्च शिक्षित असून पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरी करत आहेत.त्यांनी आपल्या आई आणि वडिलांना सोमवार दि.३० मे पासून फोन करत होते.मात्र त्यांचा फोन ते उचलत नव्हते.त्यांना आधी काही शेताच्या कामात असतील अशी शंका होती.

आपल्या मातापित्यांच्या क्रूर हत्येनंतर विलाप करताना रवींद्र भुजाडे, जालिंदर भुजाडे व अन्य नातेवाईक छायाचित्रात दिसत आहेत.

मात्र दोन दिवस होऊनही ते आपला फोन उचलत नाही म्हणून शंका आली होती.म्हणून त्यांनी आज आपले चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन लावला.व आपले आई आणि वडील फोन उचलत नाही काय भानगड आहे.म्हणून तू घरी जाऊन स्थिती जाऊन बघ अशी विनंती केली होती.सदर चुलत बंधू हे घरी गेले असता तेथे त्यांच्या घरास कुलुप होते.म्हणून त्यांनी खिडकीतुन डोकावून पाहिले मात्र आत त्यांना कोणताही सुगावा लागला नाही.म्हणून त्यांनी शेजारी असलेल्या महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावर जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला.त्यात ते दोघे नवरा आणि बायको त्यांना मृत अवस्थेत आढळून आल्याने उत्तर नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आज सकाळी आमच्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणचा गट क्रं.१४६ असून घराच्या पूर्वेस व नैऋत्येस पाण्याचे साठवण तलाव आहे तर उत्तरेस व ईशान्येस साधारण अर्धा कि.मी.अंतरावर दोन वस्त्या आहे. घटनास्थळी नगर अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल,यांनी अड सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तर रात्री श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी भेट दिली होती.आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास नगर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,कोपरगाव पोलीस ठाण्याचें पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांचे पोलीस पथक उपस्थित होते.

सदरचे घर त्यांनी साधारण सन-२००५-०६ मध्ये स्लॅबचे व वित सिमेंटचे घर बांधलेले आहे.पूर्वी याच गट क्रमांकात त्यांनी पश्चिमेस अर्धा कि.मी.अंतरावर वीट मातीचे छप्पर बांधलेले होते.मुले उच्च शिक्षण झाल्यावर साधारण २००८-०९ मध्ये पुण्याला स्थलांतरित झाले होते त्यामुळे हे पती-पत्नी एकटेच रहात होते. घराच्या छतावर घटनास्थळी एक गादी,उशी,एक दुलई,एक सतरंगी, एक औषधांची बाटली, एक चरवी,दोन जेवणाचे ताटं,दोन अस्ताव्यस्त चपला,त्यातील गादी शेजारी तर एक उत्तरेस पंधरा फुटावर आढळून आली होती.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे.

दुसरीकडे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात अद्याप शव विच्छेदन झालेले नव्हते.मात्र पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास प्रारंभ केला आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी प्रथमदर्शनी खबर देणार पोपट गोपीनाथ भुजाडे (वय-२५) रा.तीळवणी शिवार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.३९/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे आपल्या दप्तरी नोंद केली असून शव विच्छेदनाचा अहवाल आल्यावर पुढील तपासाला दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

या घटनेने सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.कोपरगाव तालुका पोलीस हद्दीत घारी ग्रामपंचायत हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून टाकून दिलेले असताना व त्यातील आरोपी अद्याप मोकाट असताना या दुहेरी हत्याकांडाच्या तपासाचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close