जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

डॉ.अभिषेक वहाडणे यांची “क्यूअर कँन्सर थेरपी” संशोधन जगात अव्वल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील धारणगांव येथील रामनाथ वहाडणे या शेतकरी कुटुंबातील मुलगा अभिषेक वहाडणे यांनी वैद्यकीय शिक्षणात उच्चान्क नोंदवत” क्युअर कॅन्सर”थेरपीत अव्वल स्थान मिळवले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्यांचा नुकताच सूर्यतेज संस्थेच्या वतीने सत्कार करतांना स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी सत्कार केला आहे.

सध्या कँन्सरवर,” केमोथेरपी’,रेडिओथेरपी’,’सर्जरी’या पध्दतीने उपचार होतो.परंतू या उपचार पध्दतीमुळे रुग्णावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.यावर संशोधन म्हणून “फोटो इमिनो थेरपी” विकसित होत आहे.ही थेरपी विकसित करण्यात शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहे. ही थेरमी कमीत वेळात आणि कमी खर्चात विकसित करण्यासाठी आर्टिफिशल ईन्टलिजन्स एम.डी.पँथोलाँजी संशोधकांना कँन्सर क्युअर करण्यासाठी मदत केली जाते.या प्रणालीमध्ये सुरुवातीला रेनहार्ड (जर्मनी),मसेंको (नाँर्थ कँरोलिना यू.एस.ए.) यांचे पंगतीत डॉ. अभिषेक वहाडणे हे तिसरे नाव वहाडणे मेथड म्हणून विकसित होत आहे.

डॉ.अभिषेक वहाडणे यांचे प्राथमिक शिकसहन धारणगांव येथील जिल्हापरिषद शाळेत तर कोपरगांवातील श्रीमान गोकुलचंद विद्यालयात माध्यमिक शिक्षण पुर्ण झाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने अशा परिस्थितीत धारणगांव ते कोपरगांव रोज सायकलवर प्रवास करत आपले शिक्षण घेतले.पुढे १२ वी सायन्स एस.एस.जी.एम.महाविद्यालयात शिक्षण घेतल्यावर संजीवनी काँलेज मध्ये ईलेक्ट्राँनिक्स अँड टेलीकम्युनिकेन अभियांत्रिकी पदवी संपादन केली. पुढील उच्च शिक्षणात फिलाँसाँफी आणि आय.आय.टी.गुहाहाटी,आसाम…हेरिटेज फेलोशिप,म्युनिक,जर्मनी…आर्टीर्फिशल इंटलिजन्स टू क्युअर कँन्सर या विषयावर सन २०१६ आय.आय.टी.गुहाहाटी,आसाम या स्वायत्त संस्थेतून “डॉक्टर” पदवी संपादन केली आहे.अभियांत्रिकी शिक्षण व देश-विदेशातील ज्ञान डॉ.अभिषेक वहाडणे यानां स्वस्थ बसू देत नव्हते.या विषयावर अमेरिकेतील कँलिफोर्निया येथील एम.डी.बायोलॉजीस्ट शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरु केले. त्यानीं कँन्सर या आजारावर सोपी,सुलभ आणि कमी खर्चात काही उपचार पध्दती विकसित करण्यासाठी वैद्यकीय सेवा देणाऱ्यांना काही संशोधन द्यावे याचा अभ्यास करून संशोधन सुरु केले आहे.

कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धती अनेक आहेत. शस्त्रक्रिया हा पहिला उपचार आणि रेडिएशन किंवा केमोथेरपी. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याने एकाच प्रकारचा उपचार कॅन्सर बरा करू शकत नाही. अचूक निदान आणि दररोज नव्या औषधांची पडणारी भर यामुळे आज ५८ टक्के कॅन्सर बरे होतात किंवा आटोक्यात राहू शकतात. ६३ टक्के कॅन्सरांमध्ये उपचारानंतर रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. कोणाला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आणि कोणाला नाही हे मात्र अजून नक्की सांगता येत नाही. कॅन्सर कोणाला होण्याची शक्यता आहे हे मात्र सांगता येते. कॅन्सरचा धोका काही व्यक्तीमध्ये वाढतो. त्याच प्रमाणे काही उपायामुळे कॅन्सर धोक्याचे प्रमाण कमी होते.

सध्या कँन्सरवर,” केमोथेरपी’,रेडिओथेरपी’,’सर्जरी’या पध्दतीने उपचार होतो.परंतू या उपचार पध्दतीमुळे रुग्णावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.यावर संशोधन म्हणून “फोटो इमिनो थेरपी” विकसित होत आहे.ही थेरपी विकसित करण्यात शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहे. ही थेरमी कमीत वेळात आणि कमी खर्चात विकसित करण्यासाठी आर्टिफिशल ईन्टलिजन्स एम.डी.पँथोलाँजी संशोधकांना कँन्सर क्युअर करण्यासाठी मदत केली जाते.या प्रणालीमध्ये सुरुवातीला रेनहार्ड (जर्मनी),मसेंको (नाँर्थ कँरोलिना यू.एस.ए.) यांचे पंगतीत डॉ. अभिषेक वहाडणे हे तिसरे नाव वहाडणे मेथड म्हणून विकसित होत आहे.ही पद्धत आता जगभरातील संशोधक “फोटो इमिनो थेरपी” क्युअर कँन्सरसाठी वापरत आहे.सध्या डॉ.अभिषेक हे बेंगलोर येथील राफुटेन या जपानी कंपनीत रिसर्च सायन्टिस्ट (संशोधक) म्हणून कार्यरत आहे. सध्या ते कोपरगांवात आले असता त्यांचे मित्र सुधाकर पाटील हे सदिच्छा भेटीला घेवून आले. या निमित्त त्यांचे संशोधनाची माहिती घेवून संशोधक डॉ.अभिषेक वहाडणे यांचा सूर्यतेज संस्थेच्या वतीने सत्कार करतांना स्वच्छतादूत सुशांत घोडके, अशोक आव्हाटे,डॉ.अमित नाईकवाडे,हिंदी वाचनालयाचे ग्रंथपाल योगेश कोळगे,सुधाकर पाटील,अमित खोकले यांनी सन्मान केला आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close