जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धारणगाव शिवारात टेम्पो पल्टी,दहा कामगार बचावले !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

धारणगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस सुमारे सात कि.मी.अंतरावर असलेल्या धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास टाटा टेम्पो हा काही मजुरांना घेऊन कोळपेवाडी कडून कोपरगावकडे भरधाव वेगाने येत असताना चालकास सोनारी फाट्याजवळ तो नियंत्रणाबाहेर गेल्याने तो दैव बलवत्तर म्हणून एका उकिरड्यातील पल्टी झाला म्हणून त्यातील कामगार बालंबाल बचावले आहे.अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन त्यांना बाहेर काढले म्हणून ते बचावले आहेत.

दरम्यान या बाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक सुरु असल्याने संपर्क होऊ शकला नाही.त्यामुळे या टेम्पोचा मालक कोण,तो नक्की कोणाचे मजूर घेऊन चालला या बाबत स्पष्ट खुलासा झाला नाही.

कोपरगाव येथील काही मजुरांना घेऊन टाटा कंपनीचा छोटा हत्ती (क्रं. एम.एच.२६ ए. डी.५७९३) हा कोळपेवाडी येथे आसवनी प्रकल्पाच्या बाटल्या साफ करण्याच्या कामाकरिता गेला होता त्यांचे काम आटोपल्यावर मजुरांना घेऊन चालक आपल्या गाडीत घेऊन त्यांना पुन्हा घरी घेऊन जात असता तो इतका वेगात होता कि, धारणगाव जवळ सोनारी फाट्यालगत चालकास तो नियंत्रित करणे अवघड होऊन तो वळणावरील एका उकिरड्याच्या खड्ड्यात जाऊन पडला या मजुरांचे दैव बलवत्तर म्हणून त्या खड्यात पाणी असल्याने त्यांना किरकोळ जखमा होऊन त्यांचा जीव वाचला आहे.या घटनेने कामगार खूपच घाबरले होते.मात्र घटनेनंतर नजीकच्या ग्रामस्थांनी त्यांना दिलासा देऊन त्या खड्यातून बाहेर काढले.त्या नंतर टेम्पो चालक निघून गेला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close