आरोग्य
लोहगावात औषध फवारणी सुरु

न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर )पावसाळा सुरू झाल्याने ग्रामपंचायतीने दिनांक २९ जुलैपासून गावामध्ये डास निर्माण फवारणीची सुरुवात केलेली आहे ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत असली तरी ग्रामस्थांनी आपल्या घरात परिसर स्वच्छ ठेवून डस निर्मूलनासाठी सहकार्य करावे जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असे आवाहन सरपंच स्मिता चेचरे यांनी केले आहे.
आजच्या घटकेला, माणसाच्या जीवाला सर्वात जास्त आणि अगदी सहज धोका उत्पन्न करू शकेल असा जगातील एकमेव कीटक म्हणजे ‘डास’ म्हणजेच ‘मच्छर’. यावर उपाय म्हणून डासांचे समूळ उच्चाटन करण्याची गरज आहे.त्याची दखल लोहगाव ग्रामपंचायतीने केली आहे.
सौ.चेचरे म्हणाल्या की फवारणी साठी ‘इकलॉक्स’ या किटकनाशकाचा वापर करण्यात येत आहे.गावापासून या मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे.प्रभाग निहाय हे काम पूर्ण करून अंतर्गत रस्ते सार्वजनिक शौचालय परिसरातील देवस्थान परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी तण निर्माणासाठी फवारणी करण्यात येणार आहे.ग्रामपंचायत सोबत ग्रामस्थांनी आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवावा रस्त्याच्या कडेचा परिसर ग्रामस्थांनी स्वच्छ ठेवावा प्रशासनाला सहकार्य करावे.आपल्या घरचा परिसरात घाण उष्टे अन्न साचून देऊ नये जुनी टायर,भंगार इतर वस्तू पाणी साचू देऊ नये परिसरात पाणी साचले असेल तर त्या खराब ऑईल टाकावे.डासांचे अंडी मरून त्याची उत्पत्ती होणार नाही.ग्रामपंचायत प्रशासनाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतात टि.सी.एल.पावडर टाकत असलेली असली तरी ग्रामस्थांनी पाणी निर्जंतुक करण्यासाठी पाण्यात मेडिक्लोर एम. किंवा वाळा या औषध वापर करावा.आपणही आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी व साथीच्या रोगावर मात करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन स्मिता चेचरे यांनी केले आहे. प्रसंगी विखे पाटील कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब चेचरे,उपसरपंच सुरेश चेचरे शांताराम चेचरे,कादर शेख,कैलास वांगे,ग्रामसेविका कविता आहेर,विवेक खालकर,पारखे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.