जाहिरात-9423439946
आरोग्य

लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपुर्ण कोपरगाव तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान जोरदार सुरु असुन त्याचाच एक भाग म्हणुन तालुक्यातील पुर्व भागात असलेल्या लौकी गावात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी लसीकरण मोहीम राबविण्यात आली.यात अठरा वर्षापुढील एकुण १५५ नागरीकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे.येत्या काळातही लसीकरणाचा वेग हा असाच ठेवण्यात येणार असून देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

या लसीकरण अभियाना दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरण करून घेतले.गावातच लसीकरण शिबिर आयोजित केल्यामुळे नागरिकांना बाहेरगावी जाऊन लस घेण्याचा त्रास कमी झाल्या मुळे नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदर शिबिर आयोजित करण्यासाठी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोरोना विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे यांच्या मार्गदर्शनाने आयोजित लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब अडसरे,डॉ.प्रज्ञा भगत तसेच आरोग्य सेविका बबिता परमाल,निर्मला डोंगरे,अनिल बनसोडे,मनिषा त्रिभुवन,चंद्रकला गुंजाळ आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

सदर प्रसंगी सरपंच-चांगदेव इंगळे,उपसरपंच-जयश्री वलटे,ग्रामविकास अधिकारी-मेहेरे पी.एम.अंगणवाडी सेविका रुपाली भवर,ग्रामपंचायत कर्मचारी विलास इंगळे,सुजित कदम आदी उपस्थित होते.तसेच प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी असे आवाहन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close