निधन वार्ता
सावळीविहिर बु.चे माजी उपसरपंच आगलावे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील सावळीविहिर बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विनायकराव लक्ष्मण आगलावे (वय-६२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन भाऊ,पत्नी,एक अविवाहित मुलगा,एक मुलगी,असा परिवार आहे.त्यांच्यावर सावळीविहिर बुद्रुक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्याच्या निधनाने माजी मंत्री राधाकृष्ण विखे,खा.सुजय विखे,राहाता बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.
स्व.विनायकराव आगलावे यांना सामाजिक कार्यांची आवड होती.ते अत्यन्त मनमिळाऊ म्हणून परिसरात व तालुक्यात परिचित होते.ते साधारण दहा वर्षांपूर्वी उपसरपंच होते.त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावांसाठी अनेक विकासाभिमुख योजना राबविल्या होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.