जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनाने महिलेचा मृत्यू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

राज्यात कोरोनाचा कहर आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.त्यात रोज शुक्ल पक्षातील चंद्रकोरी प्रमाणे त्याला उतार येत आहे.कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४९४ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५२३ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ३१७ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०१ तर अँटीजन तपासणीत ०७ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०३ असे एकूण अहवालात एकूण ११ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १२ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर काल कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील एक महिला रुग्णांचे (वय-४५) निधन झाले आहे. शहरात मात्र एकही निधन झाले नाही.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ४१६ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०९१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २०४ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ९० हजार ९४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०३ लाख ६३ हजार ७६८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १३.६५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १२ हजार १२१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.६२ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ६६ हजार ४८४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०३ हजार ५२२ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ५७ हजार ५२९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०५ हजार ४३२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत असून आज तर कहर झाला असून भाजपच्या चक्का जाम आंदोलना निमित्त मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते जमा झालेले आढळले आहे.कोरोनाचा वर्तमानात डेल्टा प्लस हा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत असून त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला असून पुन्हा एकदा निर्बंध व शनिवार रविवार बंद ठेवला आहे.व अत्यावश्यक सेवा वगळता सकाळी सात ते दुपारी चार पर्यंतच आपली दुकाने सुरु ठेवता येणार आहे.डेल्टा प्लसने उचल खाल्ली असून राज्य शासन हादरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close