जाहिरात-9423439946
विशेष लेखमाला

कोपरगाव शहर आणि तालुक्याला पाणी मिळण्यात दुहेरी चारित्र्याची अडचण

जाहिरात-9423439946

कोपरगाव शहराचा पाण्याचा तमाशा भाग-६

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रीक साम्राज्यातील विचारवंत प्लेटो म्हणाला होता.लोकशाहीत राज्यकर्ते शुद्ध चारित्र्याचे निस्वार्थी,व चिंतनशील असले पाहिजे त्यांना व्यक्तीगत संसार नसावा,कामिनी,कांचनाचा मोह नसावा,अज्ञान व आडमुठेपणा हे लोकशाहीचे शत्रू होत.राज्यकर्ते हे ज्ञान साधनेत रमणारे असावेत.त्यांची अशी वैयक्तिक मालमत्ता नसली पाहिजे.थोडक्यात ते ज्ञानी,संयमी,जाणते,निसंग व निस्पृह असावे” आज राज्यात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात पाहिले तर आपल्याला काय दिसते.सर्व विपरीतच चित्र आढळून आल्याशिवाय राहणार नाही.आज वर्तमानात नेत्यांनी काहीही सांगावे आणि त्यांच्या चेल्यांनी त्याचा उदो-उदो करावा असे दिवस आले आहे.कोपरगाव नगरपरिषद याचे उत्तम उदाहरण ठरले होते.

“कोपरगावला पाणी हे गोदावरी कालव्यातून येते म्हणून दूषित होते.व हेच दूषित पाणी कोपरगाव शहरातील जनतेला प्यावे लागते” असा आभास व कांगावा या ईशान्य गडावरील युवराजांनी व त्यांच्या माजी नेत्यांनी केला होता.मग जवळपास शंभर वर्ष येथील शेतकरी व नागरिक हेच पाणी पिण्यासाठी वापरत होते.त्यातून किती जणांना पाण्याचे रोग,ढाळ,उलट्या झाल्या असा एकही अहवाल आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे.ना जलसंपदाकडे.तसा तो असेल तर आमचे अज्ञान दूर होईल ते पुण्य तरी त्यांनी पदरी घ्यावे असे आमचे थेट आवाहन आहे.या शिवाय नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी आपले जलशुद्धीकरण प्रकल्प का राबवले.व ते राबविण्यासाठी यांनी मग कोट्यवधी रुपयांचा खर्च का केला ? असा सवाल आपसूकच निर्माण होत आहे.

सदर पालिकेचा कालावधी नुकताच संपला असला तरी त्याचे कवित्व उरतेच.कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गंभीर असल्याची आवई उठवली जाते.अर्थातच ती जाणीवपूर्वक जनतेत संभ्रम तयार करून आपली दुकानदारी चालविण्यासाठी केलेली व्यूहरचना असते हे बऱ्याच वेळा जनतेच्या लक्षात येत नाही आणि जनता त्यास बळी पडताना दिसत आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या हि अशीच निर्माण केलेली समस्या आहे.या पूर्वी आमच्याच प्रतिनिधीने सन-२०११ साली इंडिया बुल्सने पाणी पळवले त्या वेळी हि बाब सर्व प्रथम ‘दै.गावकरी’च्या माध्यमातून लक्षात आणून दिली होती.त्यावेळी या मंडळींनी चकार शब्द त्याबत काढला नव्हता.व अद्यापही त्यावर ते बोलत नाही.सोयीचे बोलायचे व गैरसोयींबाबत सविस्तर मौन पाळायचे हा अनेक दशकात त्यांच्या रणनीतीचा भाग राहिलेला आहे.

आता हेच पहाना कोपरगाव शहराला पाणी दूषित मिळते म्हणायचे,ते कालव्याद्वारे येताना दूषित होते.त्यामुळे पिण्याच्या लायकीचे नाही.असा आरोप करायचा.मग सम्बधित प्रकल्प होऊन जवळपास शंभर वर्षांचा कालखंड उलटला आहे.मग इतके दिवस हि मंडळी यावर का बोलली नाही.शिवाय राज्यातील सर्वच कालव्यांची गळती कमी करण्यासाठी ते अस्तरीकरण केले आहे.मात्र गोदावरी कालव्यांची गळती ७० टक्क्यांहून जास्त झाली आहे.यातील जवळपास ६०-७० वर्ष यांचीच राजवट तालुक्यात राहिली आहे.मग कालव्यांची गळती रोखण्यासाठी यांनी काय उपाययोजना केल्या म्हणाल तर या पातळीवर तुम्हाला शुकशुकाट पाहायला मिळेल.

आता हे पहा आणखी या गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करण्यासाठी यांनी काय प्रयत्न केले म्हणाल तर याही पातळीवर तुम्हाला स्मशान शांतता पाहायला मिळेल.इंग्रज देशातील संपत्ती लुटायला आले होते हे उघड होते.तरी त्यांनी या दुष्काळी पट्ट्यात पर्जन्य छायेच्या प्रदेशात लाखोंच्या संख्येने होणारे भूकबळी थांबविण्यासाठी या प्रदेशात धरणे बंधून कालवे तयार करून या भागात प्रतिकूल कालखंडात कालव्यांद्वारे सिंचन व्यवस्था तयार केली होती.ती पहिले महायुद्ध होण्याच्या आधी कठीण प्रसंगात केले आहे हे विशेष ! तत्पूर्वी या भागातील शेतकरी शेतमजूर म्हणून खान्देशात,मराठवाड्यात कापूस वेचायला व गुळ निर्माण करायला जात हे किती जणांना ठाऊक आहे.त्यावर उदरनिर्वाह नीट होत नसल्याने व पुरेशा पावसाअभावी अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उत्पन्न होत नसल्याने या भागात लाखो शेतकऱ्यांचे हातपाय खोडून बळी गेल्याचे दाखले पाटबंधारे विभागाच्या इतिहासात नोंदवले गेले आहे.त्यामुळे इंग्रजांनी या भागात दारणा,भंडारदरा,नीरा,खडकवासला आदी धरणे निर्माण केली व येथील लोकजीवन स्थिरस्थावर केले आहे.हा इतिहास आहे.मग १५ ऑगष्टला आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यावर आमच्या काळ्या इंग्रजांना पाणी कसे निर्माण करावे,का करावे,कोणासाठी करावे.यांना त्यावेळी वाढते शहरीकरणं दिसले नाही का ? वाढती लोकसंख्या दिसली नाही का ? देशाने औद्योगिकीकरणाची कास धरली हे माहिती नव्हते का ? नाशिक महापालिका प्रचंड प्रमाणावर वाढत आहे.नाशिक जिल्ह्यात औद्योगीकरणं वाढत औद्योगिकरण वाढत आहे हे मुंबईला विधानसभेच्या अधिवेशनाला जाताना दिसत नव्हते का ? ते का वाढत आहे.त्याची प्राथमिक गरज काय आहे ? ती दिसत नव्हती का ? सिन्नरला दोन औद्योगिकीकरण केंद्रे झपाटयाने वाढत आहे हे या मंडळींना सांगायला कोणा ज्योतिषाची गरज वाटत होती का ? कुठल्याही औद्योगिकरणास पहिली प्राथमिक गरज हि जागा आणि पाणी हीच असते हे यांना समजत नव्हते का ? दारणा धरण निर्माण करतानाच ते पर्जन्य छायेच्या प्रदेशासाठी निर्माण करण्यात येत आहे हे स्पष्ट तेथिल उदघाटनाच्या कोनशिलेवर लिहिले असताना यांच्या डोळ्यावर झापडे बांधली होती का ? मग हे पाणी महानगरे व औद्योगिकीकरण याकडे कसे वळवले गेले.त्याला जबाबदार कोण आहे ? मुंबई महापालिका जर स्वतःच्या पिण्याची व्यवस्था जर स्वतंत्र धरणे बांधून करत असतील तर नाशिक महापालिकेने त्यांच्या नागरिकांसाठी स्वतंत्र धरणे का निर्माण केली नाही ? की तेथील नागरिकांना ते पाणी फुकट देत होते.त्यांच्या जबाबदारीचे भान विधानसभेत सरकारला आणून देण्याचे काम निळवंडेच्या लाभक्षेत्रातील दुष्काळी जनतेचे वा शेतकऱ्यांचे होते का ? त्यांच्या हितासाठी पुढे येऊन निस्वार्थपणे काम करणाऱ्या निळवंडे कालवा कृती समितीचे होते ? इंडिया बुल्स हि कंपनी आधी नाशिकचे सांडपाणी शुद्ध करून त्याच्या वीज प्रकल्पाला पाणी वापरणार म्हणून बातम्या दिल्या होत्या असे असताना त्यांनी जवळपास अडीच-तीन टी.एम.सी.पाणी शेती सिंचनाचे कसे वळवले ? याला जबाबदार कोण आहे ? नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने उपसा सिंचन योजना निर्माण झाल्या त्या कोणाच्या आशीर्वादाने निर्माण झाल्या ? त्यास कोणी ना हरकत दाखले दिले ? त्यावेळी नाशिकचे लोक प्रतिनिधित्व कोण करत होते ? हे सगळे सांधे जोडले की यातील आरोपी तुमच्या समोर ठळकपणे समोर आल्याशिवाय राहणार नाही.तरीही हि मंडळी उंच नाक करून बोलत असतील ते त्याला “निर्लज्ज” म्हणण्यापलीकडे आमच्या शब्द कोशात दुसरा शब्द नाही.

“कोपरगावातील जनतेला मिळणारे पिण्याचे पाणी शुद्ध नाही” असे म्हणायचे आणि आपण आपल्या शिक्षण संस्थांना तेथील हजारो विदयार्थ्यांना मात्र तेच पाणी दारणा धरणातून मंजूर करायचे” असा दुहेरी चारित्र्याचा खेळ यांनी खेळला आहे.तात्पर्य,”कोणत्याही सामाजिक अनुभवातून काहीही शिकायचेच नाही हा तर आपल्या नगर जिल्ह्यातील विशेषतः कोपरगाव तालुक्यातील नेत्यांचा निर्धार आहे”

वैयक्तिक आयुष्यात बरेच काही नाकारले गेलेल्यांच्या मनात मिरविण्याचें,सर्वांनी आपल्याला सतत पहावे याचे आकर्षण असते.हा मनोगंड आहे.त्यातून काहीतरी चमकोगिरी करण्यासाठी कोणाचाही आधार घेण्याचे विधिशून्य उपक्रम राबविण्याचे काहींनी ठरवलेले दिसते.त्यातून हि विनोद निर्मिती होत आहे.असाच काहीसा प्रकार कोपरगाव तालुक्यात सुरु असून त्याला कोपरगाव नगरपरिषदेचा सत्ताधारी गट अपवाद नव्हता.त्यातील बऱ्याच जणांनी थेट गुलामी पत्करलेली असल्याने व तीच वर्तमानात त्यांना पवित्र वाटू लागली असल्याने अशी मंडळी त्या विरोधात आवाज उठवत नसतात.मग अशा गुलामांना वर्तमान संस्थानिकांनी मोठ्या उत्साहाने गेली पाच वर्ष आपल्या शोभायात्रेत सामील करून घेतले होते.आणि त्यांच्या करवीच मागासलेल्या विचार व्यवस्थेचे झेंडे नगरपरिषदेत पाच वर्ष पाशवी बहुमताच्या जोरावर नाचवून घेतले आहे.आक्षेप त्यांच्या उच्चार स्वातंत्र्याच्या भागवताला नाही तर तो भुताने सांगावा याला होता.ज्यांनी उभी हयात या संस्थानिकांना शिव्या देऊन आपली संघटना उभी केली त्यांनीच या मागास व्यवस्थेचे झेंडे नाचवले हा यातील मोठा विनोद होता.

आता हेच पहा ना,”कोपरगावला पाणी हे गोदावरी कालव्यातून येते म्हणून दूषित होते.व हेच दूषित पाणी कोपरगाव शहरातील जनतेला प्यावे लागते” असा आभास व कांगावा या ईशान्य गडावरील युवराजांनी व त्यांच्या माजी नेत्यांनी केला होता.मग जवळपास शंभर वर्ष येथील शेतकरी व नागरिक हेच पाणी पिण्यासाठी वापरत होते.त्यातून किती जणांना पाण्याचे रोग,ढाळ,उलट्या झाल्या असा एकही अहवाल आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे.ना जलसंपदाकडे.तसा तो असेल तर आमचे अज्ञान दूर होईल ते पुण्य तरी त्यांनी पदरी घ्यावे असे आमचे थेट आवाहन आहे.या शिवाय नगरपंचायत व ग्रामपंचायतींनी आपले जलशुद्धीकरण प्रकल्प का राबवले.व ते राबविण्यासाठी यांनी मग कोट्यवधी रुपयांचा खर्च का केला ? असा सवाल आपसूकच निर्माण होत आहे.तालुक्यातील प्रादेशिक व शहरातील कोट्यवधींच्या विविध विस्तारित पाणी योजना का राबवल्या असा रास्त सवाल निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.आता खरा कहर पुढे आहे.”कोपरगावातील जनतेला मिळणारे पिण्याचे पाणी शुद्ध नाही” असे म्हणायचे आणि आपण आपल्या शिक्षण संस्थांना तेथील हजारो विदयार्थ्यांना मात्र तेच पाणी दारणा धरणातून मंजूर करायचे” असा दुहेरी चारित्र्याचा खेळ यांनी खेळला आहे.तात्पर्य,”कोणत्याही सामाजिक अनुभवातून काहीही शिकायचेच नाही हा तर आपल्या नगर जिल्ह्यातील विशेषतः कोपरगाव तालुक्यातील नेत्यांचा निर्धार आहे”त्यासाठी सोबत पुरावा देत आहे.यात दि.०५ मार्च २०२१ चा शासन निर्णय क्रं.बि.सिं.आ.२०२०/(२२६/२०)सिं.व्य.(धो.-२)अवश्य पहा.निळवंडेचे पाणी कोपरगाव शहराला मंजूर करताना ते मुख्य अभियंता नाशिक यांचेकडून बेकायदेशीरपणे मंजूर केले तर आपल्या शिक्षण संस्थेस मात्र तेच पिण्याचे पाणी मात्र जलसंपदा मंत्री यांचे अध्यक्षतेखाली दि.१७ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत इतिवृत्तातील मुद्दा क्रं.२ नुसार अनुक्रमांक १० मधील संस्थेला म्हणजेच संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटी,सहजानंदनगर पो.शिंगणापूर ता.कोपरगाव जिल्हा अ,नगर या संस्थेस दारणा धरण प्रकल्प-गोदावरी डावा कालव्यातून ०.२५७ द.ल.घ.मी.पाण्यास मंजुरी मिळवली आहे.व त्यासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे आदेश क्रं.१/२०१८ मधील तरतुदी व महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांच्या दि.२२ सप्टेंबर २०१७ च्या पाणी हक्क वाटप निकषानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.हा शासन निर्णय शासनाचे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.त्याचा संकेतांक २०२१०३०५१६२५४८०१२७. असा आहे.त्यावर खाली वैजनाथ पिल्ले शासनाचे उपसचिव यांची सही आहे.चिकित्सक वाचकांनी तो जरूर पहावा.

आणखी एक बाब लक्षात आणून दिली पाहिजे ती हि की,”आपल्या पेक्षा आपला कार्यकर्ता बुद्धिमान नको” या आग्रहामुळे आपल्याकडे सगळे राजकीय पक्ष व त्यांचे कार्यकर्ते हे फक्त होयबांची कुरणे झाली आहे.याचा दाहक अनुभव नुकत्याच संपलेल्या नगरपरिषदेत असलेल्या बहुमतातील नगरसेवकामुळे दिसून आला आहे.आपल्या निरोप समारंभात मावळते नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी याच बाबीवर नुकताच आपल्या समारोपाच्या भाषणात प्रकाशझोत टाकला हे एक दृष्टीने बरे झाले आहे.आता प्रश्न असा निर्माण होतो की.कोपरगाव शहराला पाणी मंजूर करताना नाशिक येथील मुख्य अभियंता यांच्याकडून त्यांना हे पाणी मंजुरीचे अधिकार नसताना बेकायदा मंजूर केले गेले (हे अधिकार कार्यकारी संचालक,गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद यांना आहे) तर आपल्या शिक्षण संस्थेला मात्र कायदेशीरपणे सर्व प्रक्रिया राबविली गेली व मंत्री गटाच्या उपसमितीकडून मंजूर केले गेले यातील इंगित काय ? याचा जाब या प्रक्रियेत असणाऱ्या राजकीय नेत्यांनी द्यायला हवा मात्र असे होणार नाही.व असा सवाल करण्याचा अधिकार आज फारच थोड्या संघटना व त्यांच्या नेत्यांकडे आज शिल्लक आहे.ज्यांनी तो १९८४-८५ ला सेनेच्या माध्यमातून या संस्थानिकांना विरोध करून मिळवला होता.त्यातील बहुतांशी लोक आता या दोन संस्थानिकांच्या वळचणीला जाऊन सत्तेचे गुलाबजामुन चघळत असताना दिसत आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीत यावर विरोधी पक्ष फार काही हलकल्लोळ निर्मांण करतील असे वाटत नाही.काही (एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके ते जास्त वाटावे अशी स्थिती ) सामाजिक कार्यकर्ते मात्र त्या दिशेने चांगली वाटचाल करत आहे.हे येथे विशेषत्त्वाने नमूद केले पाहिजे.

“शूद्र हेतूंनी केलेल्या उद्योगांचा शेवट देखील तितकाच किंबहुना अधिकच शुद्र असतो” हा इतिहास आहे.याची याठिकाणी मुद्दामहून आठवण करणे ईष्ठ ठरेल.”विरोध तथ्य आणि सत्य यांच्या जोरावर व्हावा,उलट्या बोंबा मारणे याला वैचारिक विरोध म्हणत नाही” हे इथे नमुद करणे गरजेचे वाटते.वर्तमानात कोपरगावात मात्र याचाच सुकाळ आहे.त्यामुळे वर्तमान राजकीय व्यवस्था पाहता या तालुक्यातील नागरिकांना व शेतकऱ्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटल्या प्रमाणे,”ब्रम्हदेवही वाचू शकत नाही” याची मुद्दाम आठवण होत आहे.निळवंडेचे पाणी आणले तर कालव्यांना पिण्याच्या पाण्याच्या निमित्ताने येणारे आवर्तनही बंद होऊन या तालुक्याची राख होण्यास उशीर लागणार नाही.व पुन्हा एकदा हा तालुका सन १९१८ पूर्वीचा अन्नपाण्यावाचून तडफडणाऱ्या व बळी जाणाऱ्या नागरिकांचा दुष्काळी तालुका ओळखला जाण्यास उशीर लागणार नाही या भूतकाळाची आठवण करणे इष्ठ ठरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close