आरोग्य
कोपरगाव तालुक्यात दोन मृत्यू,कोरोना रोडावला
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर ११ हजार ०७० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०० हजार ९७१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १६८ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४७ हजार ८३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ९१ हजार ३४० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २३.१४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ०९ हजार ९३१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८९.७१ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख २१ हजार ०७७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ३० हजार २२१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ८८ हजार ४१८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ४३७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यात रुग्णसंसख्या रोडावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.ताळेबंदीचा इष्ट परिणाम आता स्पष्ट दिसू लागला आहे.