जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पत्नीचा खून करून केला आत्महहत्येचं बनाव,आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील रहिवासी असलेल्या आरोपीचा आपल्या पत्नीशी काही अज्ञात कारणाने वाद होऊन त्याचे पर्यवसान पत्नीला काही टणक वस्तूने मारहाण करून तिच्या मृत्यूला कारणीभूत होऊन तिच्यावर ज्वालाग्राहीं पदार्थ टाकून जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न करून ती आत्महत्या ठरविण्यासाठी तिला नवे कपडे घालून इतर नातेवाईकांना निरोप धाडले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलिसांनी आरोपी विजय उर्फ बंडू आप्पासाहेब गवळी याचे विरुद्ध दाखल केला आहे.ही घटना दि.१३ मे च्या रात्री ०८ वाजेच्या दरम्यान केल्याचे उघड झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपीचा आपल्या पत्नीशी काही अज्ञात कारणाने वाद होऊन त्याचे पर्यवसान पत्नीला काही टणक वस्तूने मारहाण करून तिच्या मृत्यूला कारणीभूत होऊन तिच्यावर ज्वालाग्राहीं पदार्थ टाकून जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न करून ती आत्महत्या ठरविण्यासाठी तिला नवे कपडे घालून इतर नातेवाईकांना निरोप धाडले असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील या घटने प्रकरणी अगोदर कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन आमृ रजिस्टर नंबर १८/२०२१ सीआरपीसी १७४ प्रमाणे दिनांक १४ मे रोजी दाखल असून सदर अ.मृ.मधील मयत सुवर्णा विजय ऊर्फ बंडू गवळी रा मढी खुर्द तालुका कोपरगाव हिचे व तिचा पती आरोपी विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी रा मढी खुर्द तालुका कोपरगाव यांच्यात दिनांक १३ मे राेजी ०८ वा. सुमारास काही अज्ञात कारणाने पती पत्नीच्या भांडण झाले होते. भांडणात आरोपीने मयत महिलेच्या डोक्यावर मागील बाजूस काहीतरी टनक शस्त्राने मारून जिवे ठार मारले आहे व त्यानंतर मृत शरीरावर काहीतरी ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या अंगावरील जळालेले कपड्यांचे अवशेष लपवून ठेवले व तिच्या मृत शरीरावर नवीन कपडे घातले व मयताने आत्महत्या केल्याची खोटी माहिती नातेवाईकांना देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला वगरे मजकुराच्या फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close