जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना तपासणीसाठी…या उद्योग समुहाची आर्थिक मदत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असताना रॅपिड टेस्ट किटसाठी आ.आशुतोष काळे यांनी मदत केली डॉ फुलसुंदर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कैलास ठोळे,राजेश ठोळे यांनी सोनापाॅली व ठोळे उद्योग समूहाचे वतीने एक्कावन हजाराची मदत दिली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात कालअखेर बाधित रुग्ण संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ असून त्यातील ०२ हजार ०१३ जणांचे निधन झाले आहे.कोपरगावातील अधिकृत आकडा लपवला जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन हादरले आहे.या पार्श्वभूमीवर हि मदत उल्लेखनीय मानली जात आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शनिवारी राज्यात तब्बल ६३ हजार २८२ नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे शनिवारी ६१ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ३९ लाख ३० हजार ३०२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.तर नगर जिल्ह्यात अद्याप पर्यंत कोरोनाची लाट ओसरण्याचे नाव घेत नाही.नगर जिल्ह्यात कालअखेर बाधित रुग्ण संख्या ०१ लाख ७५ हजार ०९४ असून त्यातील ०२ हजार ०१३ जणांचे निधन झाले आहे.कोपरगावातील अधिकृत आकडा लपवला जात आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासन हादरले आहे.वैद्यकीय साधने अपूर्ण पडत आहे.सहकारी साखर कारखान्यांनी मदत करायला पाठ फिरवली आहे.या पार्श्वभूमीवर हि मदत डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरली आहे.या बाबतीत नागरिकांनी स्वागत केले आहे.

यावेळी तहसीलदार चंद्रे,मुख्याधिकारी शशिकांत सरोदे,पोलिस निरिक्षक वासुदेव देसले,वैद्यकीय अधिकारी डॉ.कॄषणा फुलसौंदर,कैलास ठोळे, राजेश ठोळे,डॉ.संतोष विधाते आदि मान्यवर उपस्थित होते.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नेहमी सामाजिक सेवाभावी वृत्तीने ठोळे उद्योग समूहाचे वतीने दिलेली हि मदत नक्कीच मोलाची ठरणार आहे.समाजाने शासकीय प्रशासकीय आदेशांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close