आरोग्य
असंसर्गजन्य रोगांची वाढती संख्या चिंताजनक-डॉ.फुलसुंदर
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
बदलत्या जीवनशैलीसह अनेक आजारही घराघरांत पोहोचले आहेत.लहान वयापासूनच वाढते वजन,उच्च रक्तदाब,मधुमेह यां सारख्या आजारांच्या तक्रारी चिंताजनक वाढल्या जातात.अपुरी झोप,वाढता ताण,जेवणाच्या बदलत्या सवयीं नागरिकांना आगामी काळात बदलाव्या लागतील असे प्रतिपादन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसूंदर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“अतिताण,वाढते वजन तसेच मधुमेह,उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांचे प्रमाण बदलत्या जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढते,वेगाने फोफावणाऱ्या संसर्गजन्य नसणाऱ्या रोगांवर उपचार दर महिन्याला शिबिर आयोजित करून करण्यात येणार आहे”-डॉ.कृष्णा फुलसुंदर
कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णालयाचे वतीने नुकतेच मोफत मानसोपचार व असंसर्गजन्य रोग निदान शिबिराचे उदघाटन महिला दिनानिमित्त महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री कांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर,जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत आयोजन करण्यात आले होते.मानसोपचार तज्ज्ञ डॉ.योगेश गाडेकर,विवेक मगर (मानसिक आरोग्य),अनिकेत केदारे,गोरख इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच शिबिराचे उद्घाटन महीला दिनाचे औचित्य साधून महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री कांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.शिबिरा बाबत डॉ.कृष्णा फुलसौंदर वैद्यकीय अधीक्षक यांनी माहिती व नागरिकांना आवाहन केले तसेच डॉ.गणबोटे डॉ.ईनामदार व कोविड सेंटरचे सर्व डॉक्टर्स कर्मचारी हजर होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”अतिताण,वाढते वजन तसेच मधुमेह,उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांचे प्रमाण बदलत्या जीवनशैलीमुळे झपाट्याने वाढते,वेगाने फोफावणाऱ्या संसर्गजन्य नसणाऱ्या रोगांवर उपचार दर महिन्याला शिबिर आयोजित करून करण्यात येणार आहे.कोपरगाव पालिकेच्या आरोग्य विभागा हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.राज्य सरकारतर्फे हाती घेण्यात आलेल्या या आरोग्य चाचणी मोहिमेनुसार शहरात या कालावधीत कुष्ठरोग,क्षयरोग आणि असंसर्गजन्य रुग्णांचा शोध शहरातील नागरिकांत घेतला जाणार आहे.
यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ.गायत्री कांडेकर या बोलताना म्हणाल्या की,”बदलत्या जीवनशैलीसह अनेक आजारही घराघरांत पोहोचले आहेत.लहान वयापासूनच वाढते वजन,उच्च रक्तदाब,मधुमेह यांसारख्या आजारांच्या तक्रारी चिंताजनक वाढल्या जातात.अपुरी झोप,वाढता ताण,जेवणाच्या बदलत्या सवयींमुळे हे रोग वाढत असले तरी त्यांची गांभिर्याने दखल घेणे गरजेचे असल्याने राज्य सरकारतर्फे या रोगांचा शोध घेणारी मोहीम हाती घेण्यात आली आहे.यामध्ये कुष्ठरोग तसेच क्षयरोग यांचीही तपासणी केली जाणार आहे.असंसर्गजन्य रोगांच्या शोधासाठी प्रश्नावली तयार करण्यात आली असून प्रत्यक्ष चर्चेतूनही ही तपासणी केली जाणार आहे.या बाबत नागरिकांत जनजागृती व्हावी या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले होते.
यावेळी मानसोपचार तज्ञ डॉ.योगेश गाडेकर हे बोलताना म्हणाले की,”निरनिराळया मनोविकारांवर काय उपचार केले जातात याची सर्वसाधारण लोकांना अत्यंत कमी माहिती असते.सहसा मंत्रतंत्र,मारझोड,उपेक्षा अशा गोष्टींचाच प्रचार होतो.अंधश्रध्दा ही मोठी समस्या असते.आधुनिक उपचार म्हणजे केवळ शॉक नाही तर मनोरुग्णालयात डांबून ठेवणे अशीही कल्पना असते या बाबत नागरिकांना माहिती होणे गरजेचे असते.गंभीर मानसिक आजारांचे उपचार जरा जास्त अवघड व दीर्घ मुदतीचे असतात.भ्रमिष्टावस्था,अतिनैराश्य,उन्माद,इत्यादींचे मनोरुग्ण ब-याच वेळा दीर्घकाळ रुग्णालयात ठेवावे लागतात.योग्य औषधोपचाराने त्यांची अवस्था निदान आटोक्यात राहू शकते.समाजात यातल्या काही जणांचे पुनर्वसनही करता येते.साधारण मनोविकारांवरचे उपचार तर ब-याच प्रमाणात यशस्वी होतात असे मनोरुग्ण इतरांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतात व आपापले व्यवसाय करू शकतात.सदोष व्यक्तिमत्त्वावर फारसे उपचार लागत नाहीत.अशा आजारांत नातेवाईक,मित्र यांच्यावरही जबाबदारी असते ती त्या व्यक्तीला मानसिक आधार व मदत देण्याची.योग्यवेळी रोगनिदान झाले,औषधोपचार मिळाले तर सर्वांच्या मदतीने बहुतांश मनोरुग्ण चांगले जीवन जगू शकतील.यासाठी मानसोपचारतज्ज्ञ किंवा मानसिक आरोग्यकेंद्राचे डॉक्टर मदत करतील असे आश्वासन दिले आहे.
या शिबिरासाठी आलेल्या मान्यवरांचे डॉ.गणबोटे यांनी आभार मानले आहे.