जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव तालुक्यातील…या ठिकाणचा महाशिवरात्री महोत्सव रद्द !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

संवत्सर-(शिवाजी गायकवाड)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील सालाबादप्रमाणे संपन्न होणारा शिवरात्री महोत्सव या वर्षी कोरोनाची वाढती साथ लक्षात घेता व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश लक्षात घेता रद्द करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्यामुळे शिवभक्तांचा भ्रमनिरास झाला आहे.

या ठिकाणी गोदावरी तीरी दक्षिण बाजूस विभांडक ऋषी व उत्तर बाजूस पुत्र शृंग ऋषींची पवित्र समाधी आहे.ते दोन्ही विभांडक कृषिचे पुत्र होते.या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांच्या जन्माच्या अगोदर महारथी दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी “पुत्र कामेष्ठी यज्ञ” करून घेण्यासाठी शृंग ऋषींना अयोध्येत घेऊन गेले होते.या यज्ञानंतर प्रभू रामचंन्द्राचा जन्म झाल्याचे मानले जाते.तसा पुराणात उल्लेख आहे.ते हेच पवित्र ठिकाण मानले जाते.

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात.प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो,तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.यावर्षी तो गुरुवार दि.११ मार्च रोजी येत आहे.कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे गोदावरी तीरी असलेल्या शृंगऋषींच्या मंदिरात संपन्न होत आहे.मात्र या वर्षी कोरोनाची साथ जवळपास वर्ष उलटत येऊनही अद्याप नियंत्रणात आलेली नाही.जिल्हाधिकारी श्री भोसले यांनी नूकताच एक आदेश काढून गर्दी असलेले सण महोत्सव कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश पारित केलेले आहे.लग्न महोत्सवही केवळ पन्नास नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न अकरण्याचे निर्देश दिले आहे.त्यामुळे या आदेशाचा प्रतिकूल परिणाम या महोत्सवात झाला आहे.त्यामुळे या दिवशी भाविकांनी या ठिकाणी गर्दी करून नये असे आवाहन केले आहे.

त्यामुळे या निमित्त संपन्न होणारे भजन,कीर्तन,गंगास्नान,आदी कार्यक्रम रद्द केले असल्याची माहिती संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सुलोचना ढेपले व उपसरपंच विवेक परजणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.केवळ औपचारिकता म्हणून गंगास्नान,श्रींचे महापूजन आदी कार्यक्रम केवळ साध्या पद्धतीने पुजाऱ्यामार्फत करण्यात येणार आहे.

दरम्यान या ठिकाणच्या मंदिराचे काम तीर्थ क्षेत्र विकास निधीतून नगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या ५० लाख रुपयांच्या निधीतून प्रगतीपथावर आहेत.

या ठिकाणी गोदावरी तीरी दक्षिण बाजूस विभांडक ऋषी व उत्तर बाजूस पुत्र शृंग ऋषींची पवित्र समाधी आहे.ते दोन्ही विभांडक कृषिचे पुत्र होते.या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांच्या जन्माच्या अगोदर महारथी दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी “पुत्र कामेष्ठी यज्ञ” करून घेण्यासाठी शृंग ऋषींना अयोध्येत घेऊन गेले होते.या यज्ञानंतर प्रभू रामचंन्द्राचा जन्म झाल्याचे मानले जाते.तसा पुराणात उल्लेख आहे.ते हेच पवित्र ठिकाण मानले जाते.याच ठिकाणी हाकेच्या अंतरावर चक्रधर स्वामीचे मंदिर आहे.या ठिकाणीही या दिवशी गंगाभिषेक करण्यात येत असतो.या ठिकाणी ह.भ.प.शिवाजी महाराज भालुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो मात्र यावर्षी भाविकांना या कार्यक्रमास मुकावे लागणार आहे.दरवर्षी या ठिकाणी चांगदेव जगताप व संतोष वाघ यांच्या वतीने खिचडी प्रसादाचे भाविकांना वाटप होत असते.दुसऱ्या दिवशी या कार्यक्रमाचा सांगता समारंभ संपन्न होत असतो.यावर्षी व्यापाऱ्यांनी आपली खेळणी,मिठाई,स्टेशनरी आदींची दुकाने आणु नयेत असे आवाहन यात्रा समितीने केले आहे.नियमांचे पालन केले नाही तर तालुका प्रशासन कारवाई करू शकते असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close