जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात नीचांकी रुग्ण संख्या,ग्रामीण भाग निरंक

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण २० अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात ०१ रुग्ण बाधित आढळले आहे तर नगर येथील तपासणी अहवालात १ तर खाजगी प्रयोग शाळेतील ०१ असे एकूण ०३ बाधित रुग्ण वाढले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.ग्रामीण भागात आज एकही रुग्ण निघाला नाही हे विशेष !

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा ५२ हजार ४९२ जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ८०८ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून ३७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत सप्ताहात ग्रामीण भागात अधिक प्रमाणावर रुग्ण वाढत असले तरी शहरी भागात ते कमी झाले आहे.हि समाधानाची बाब आहे.

आज आलेल्या यादीत शहरात बैल बाजार रोड परिसरएक महिला वय-४६ व लक्ष्मीनगर येथे एक पुरुष वय-२० असे निच्चांकी ०२ बाधित रुग्णांची संख्या तर ग्रामीण भागात संजीवनी कारखाना परिसरात ०१ असे ०३ रुग्ण बाधित निघाले आहे तरी एकूण शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण संख्या पाहता रुग्ण संख्या कमी झाल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले आहे.ग्रामीण भागात एकही रुग्ण बाधित निघाला नाही हे विशेष !

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ०७६ इतकी झाली आहे.त्यात ५३ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७८ टक्के आहे.आतापर्यंत ११ हजार ७४२ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४६ हजार ८८८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.६५ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ९८७ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ९५.७१ टक्के झाला आहे.दरम्यान ग्रामीण व शहरी भागातील बाधित आकडेवारी कमी झाल्यामुळे नागरिकांत समाधान निर्माण झाले आहे. तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close