जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

स्मशान व बस शेड मध्ये स्वतःच्या कार्यकर्ते ठेकेदारांनाही डावलल्याने कार्यकर्त्यांत असंतोष !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव ( प्रतिनिधी )

कोपरगाव तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यावर व तालुक्यात आपले काहीच काम दिसत नसल्याने निवडणुकीला सामोरे कसे जायचे या समस्येने ग्रासलेल्या अस्वस्थ सत्ताधाऱ्यांनी युद्धपातळीवर व घाईघाईने बस थांबे उभारण्याचा निर्णय घेतला खरा पण त्याचा ठेका आपल्या सांभाळल्या (पाळलेल्या!) ठेकेदारांना न देता एका जवळच्या मजूर संस्थेचा वापर करून युवराजाने सर्वच कामे स्वतःच्याच घशात घालण्याचा अश्लाघ्य प्रकार उघड झाला असून हि बाब कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांच्यात नाराजीची लाट पसरलेली असल्याची विश्वसनिय बातमी हाती आल्याने तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोपरगाव तालुक्यातील अनेक गावानजीक व रस्त्यांच्या बाजूला घाईघाईत “बस थांबे” उभारण्यात आले आहेत. निवडणुक जवळ आलेली असल्याने मतदारांना भुलविण्याचे प्रकार सुरू आहेत. पाच वर्षे झोपा काढलेल्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली असून त्यांची देहबोली फार मोठ्या प्रमाणात बदलली असल्याची पक्की खबर आहे.त्यातून कार्यकर्ते जनसामान्यांशी बोलताना आढळले तरी त्यांची चिडचिड होत असून त्यातून त्यांचा पारा लवकरच चढत असल्याच्या घटना कार्यकर्त्यांना वारंवार आढळून येत असून याच्या खबरा कर्णोपकर्णी लागत आहे.

या मंडळींचे सर्व डावपेच कार्यकर्त्याना सामान्य माणसांना परिचित झाले आहेत.त्याना आता कार्यकर्ते जीव ओतून काम करत नसल्याची चांगलीच जाणीव होऊ लागल्याने त्यांची चिडचिड होऊ लागली आहे.त्यांचा फटका अनेक नगरसेवक,नगरसेविका,माजी पदाधिकारी यांना बसत असून त्यातून ते योग्य तो बोध घेत आहेत.वाळूचे ठेके आपल्याच घरात,समृद्धीचे उपकंत्राट आपल्याच युवराजांच्या हातात ,स्मशान शेडचा ठेका आपल्याच युवराजांच्या ताब्यात,बस शेडचा ठेका आपल्याच घशात,त्यामुळे कार्यकर्त्याना आपले दातावर दात आदळून घेण्याचा अनास्था प्रसन्न आला आहे.कोपरगाव बस आगाराच्या इमारतीचे ,साईबाबा कॉर्नर ते वैजापूर रस्त्याचे काम महिनाभर का बंद होते यांचे उत्तर कार्यकर्त्यांना अधिक जवळून माहित आहे.टक्का पोहच झाला कि त्यांना चांगली गती आल्याचे सर्वांनी अनुभवले आहे.

निवडणुका जवळ आल्या कि गोडगोड बोलायचे सोंग करायचे निवडणूका संपन्न झाल्या कार्यकर्त्यांची गरज संपली कि,त्याना तुपात पडलेल्या माशीसारखे पटकन बाजूला फेकून द्यायचे हि या प्रस्थापितांची गत पन्नास वर्षातील खासियत बनली आहे.व ती कार्यकर्त्यांना आता अच्छि-खांसी परिचित झालेली आहे.गत निवडणुकीतील दादा-वाहिनीचा अनुभव अनेक कार्यकर्त्याना खूप काही शिकून गेला आहे.त्यामुळे बरेच जण आता अंग झटकून चक्क गंम्मत पाहत बाजूला उभे असून काही केवळ जवळ असल्याचे सोंग आणत आहे.गत वेळी नाशिक स्थित या सत्ताधाऱ्यांच्या कुटुंबियातील एका डॉक्टरने अनेकांना लिंबू देऊन ते पाच वर्ष पसार झाले कोणाचा फोन उचलण्याची महाशयांनी तसदी घेतली नाही.आता ते पुणतांबा ,वाकडी परिसरात लिंबू देत फिरत असल्याची माहिती आहे.माजी मंत्री तर शब्द द्यायला पटाईत होते.काही गुळाने तर काही विषाने मारण्यात पटाईत आहे.आता या मंडळींचे सर्व डावपेच कार्यकर्त्याना परिचित झाले आहेत.त्याना आता कार्यकर्ते जीव ओतून काम करत नसल्याची चांगलीच जाणीव होऊ लागल्याने त्यांची चिडचिड होऊ लागली आहे.त्यांचा फटका अनेक नगरसेवक,नगरसेविका,माजी पदाधिकारी यांना बसत असून त्यातून ते योग्य तो बोध घेत आहेत.वाळूचे ठेके आपल्याच घरात,समृद्धीचे उपकंत्राट आपल्याच युवराजांच्या हातात ,स्मशान शेडचा ठेका आपल्याच युवराजांच्या ताब्यात,बस शेडचा ठेका आपल्याच घशात,त्यामुळे कार्यकर्त्याना आपले दातावर दात आदळून घेण्याचा अनास्था प्रसन्न आला आहे.कोपरगाव बस आगाराच्या इमारतीचे ,साईबाबा कॉर्नर ते वैजापूर रस्त्याचे काम महिनाभर का बंद होते यांचे उत्तर कार्यकर्त्यांना अधिक जवळून माहित आहे.टक्का पोहच झाला कि त्यांना चांगली गती आल्याचे सर्वांनी अनुभवले आहे.या पूर्वी मोठ्या नेत्यांच्या काळात अशी हलकट कामे कधीच झाल्याची चर्चा चुकूनही ऐकू आली नव्हती मात्र या पाच वर्षात मात्र कहरच झाला आहे.

वारी ते भोजडे मार्गे वैजापूर या मार्गावर गत पंधरा वर्षांपासून अद्याप राज्य परिवहन मंडळाची एकही बस धावलेली नसताना त्या मार्गावर बस थांबा बांधून कोणते पुण्य मिळवले याचा त्या गावातील ग्रामस्थ कसून शोध घेत आहेत.पूर्वी या मार्गावर वैजापूर-शिर्डी,वैजापूर-श्रीरामपूर या बस धावत होत्या मात्र तो आता पंधरा वर्षांपूर्वी इतिहास आहे हे कोणीतरी कार्यकर्त्यांनी या मंडळींना सांगणे गरजेचे आहे.

रोजगाराच्या गप्पा मारायच्या मात्र औद्योगिक वसाहतीबाबत सोयीस्कर मौन पाळायचे,नवीन कौशल्य अभ्यासक्रमाबाबत गप्पा मारायच्या मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अपूर्ण इमारातीकडे ढुंकूनही पाहायचे नाही.निवडणूक आल्या कि उजनी,अर्धवट प्रादेशिक पाणी योजना,निळवंडेची खोटी उदघाटने पार पाडायची,अकरा टि. एम.सी.च्या गप्पा मारायच्या हे आता तालुक्याला नवीन राहिलेले नाही. मतदान मिळण्यासाठी आता मतदारांनी चक्क चंद्र,सूर्य,नद्या,नाले,माणिक,मोती मागितले तरी यांचीच काय कोणाचीच नाही म्हणायची बिशाद नाही.हे मतदारही ओळखून आहेत.त्यामुळे वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायला आता तेही मागे पुढे पाहत नाही.मते कोणाला द्यायची ते पुढले पुढे पाहू !म्हणण्याचे धारिष्टे त्यांच्यात आता अनुभवाने आले आहे.2016 साली झालेल्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी आपणही किती चतुर आहोत याचे यांना रोड मॉडेल दाखवून दिले आहे. नाही या मंडळीनेच त्यांना अनुभवाने करायला भाग पडले आहे.या बस थांब्यांची मूळ रक्कम,व काढलेल्या रकमा या बाबत आमच्या प्रतिनिधीने या पूर्वीच भंडाफोड केलेला आहे.सुशिक्षित अभियंत्यांना 33 टक्के कामे देण्याचा नियम असतांना या स्वार्थी नेत्यांनी मात्र अधिकाऱ्यांवर दबाव आणून आपल्या एका पित्याच्या नावावर ही कामे करून घेतली व खिशातील मजूर संस्थेच्या नावावर रकमा काढून घेतल्या.याची शहरात ,मोठी चर्चा चौका-चौकात सुरु आहे.

वारी ते भोजडे मार्गे वैजापूर या मार्गावर गत पंधरा वर्षांपासून अद्याप राज्य परिवहन मंडळाची एकही बस धावलेली नसताना त्या मार्गावर बस थांबा बांधून कोणते पुण्य मिळवले याचा त्या गावातील ग्रामस्थ कसून शोध घेत आहेत.पूर्वी या मार्गावर वैजापूर-शिर्डी,वैजापूर-श्रीरामपूर या बस धावत होत्या मात्र तो आता पंधरा वर्षांपूर्वी इतिहास आहे हे कोणीतरी कार्यकर्त्यांनी या मंडळींना सांगणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close