कृषी विभाग
पिक विमा धारकांना अग्रीम पिकविमा द्या-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने तातडीने अग्रीम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या असून कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अग्रीम पिक विमा रक्कम मिळाली असून अनेक शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही.त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे.

“कोपरगाव तालुक्यातील एकूण ६४,०२३ पिक विमा धारक शेतकऱ्यांपैकी सोयाबीन-१०,०००,मका -६,०००,बाजरी-७४०, कांदा-४३५,कपाशी-३,८८८ व तुर-२१५ अशा एकूण २१,२७८ शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही ती तातडीने मिळणे गरजेचे आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानीसंदर्भात एकंदरीत २४ जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आली होती.आता १२ जिल्ह्यांमध्ये या अधिसूचनेवर विमा कंपन्यांचे कोणतेही आक्षेप नसून ९ जिल्ह्यांमध्ये अंशत: आक्षेप आहेत.राज्य स्तरावर सध्या बीड,बुलढाणा, वाशिम,नंदूरबार,धुळे,नाशिक,अ.नगर, पुणे,अमरावती अशा ९ जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्यांच्या आक्षेपावर अपील सुनावणी सुरु असून पुणे आणि अमरावती वगळता इतर ठिकाणची सुनावणी नुकतीच संपली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत १ कोटी ७० लाख ६७ हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ १ रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे.यासाठी एकूण ८ हजार १६ कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून ३ हजार ५० कोटी १९ लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील शेतकरी अद्याप वंचित असल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी त्यांनी हि मागणी केली असल्याचा त्यांचा दावा आहे.
कोपरगांव विधानसभा मतदार संघातील ४५,०६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा घेतला असून एकूण ६४,०२३ शेतकऱ्यांनी पिकविमा अर्ज दाखल केलेले होते.विमा कंपनीच्या निकषानुसार नुकसान होवून देखील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम मिळालेली नव्हती.त्यामुळे शेतकऱ्यांना अग्रिम पिक विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे,कृषी विभागाचे मुख्य सचिव अनुप कुमार व जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे केलेल्या मागणीतून पिक विमा कंपनीने प्राथमिक स्वरुपात सोयाबीन पिकाचे अग्रीम पिक विमा रक्कम वाटप केली असून यामध्ये सोयाबीन पिक विमा धारक काही शेतकऱ्यांना अग्रीम पिक विमा रक्कम मिळालेली नाही.
यामध्ये एकूण ६४,०२३ पिक विमा धारक शेतकऱ्यांपैकी सोयाबीन-१०,०००, मका -६,०००,बाजरी- ७४०, कांदा- ४३५,कपाशी-३,८८८ व तुर-२१५ अशा एकूण २१,२७८ शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा रक्कम अद्याप मिळालेली नाही.मतदार संघातील कोपरगांव,सुरेगांव,दहेगांव,रवंदे,पोहेगांव व पुणतांबा मंडलामध्ये जवळपास दीड महिना पावसाचा खंड पडल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान होवून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पिक विम्याच्या माध्यमातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची पर्वा न करता उसनवार व कर्ज घेवून रब्बी हंगामातील पिके उभी केली असून रब्बी हंगामातील पिकांच्या पुढील खर्चाला पिक विमा रक्कमेचा हातभार लागणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा विचार करून कोपरगाव मतदार संघातील उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने अग्रीम पिक विमा रक्कम देणे बाबत पिक विमा कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री मुंडे यांना दिलेल्या पत्रात शेवटी केली आहे.