आरोग्य
कोपरगाव तालुक्यात पुन्हा बाधित रुग्णांत वाढ !
जनशक्ती न्यूज सेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या साथीने उच्चान्क गाठला असला तरी गत दोन दिवसापासून रुग्ण वाढीला आळा बसला असल्याचे चित्र असताना आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांचा आकडा वाढला असून अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये १७ तर नगर येथील श्राव तपासणीचे तीन असे २० रुग्ण बाधित असल्याची धक्कादायक माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
दरम्यान आता कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३७१ झाली असून त्यात १०९ सक्रिय आहेत.तर आता अपर्यँत २ हजार १२९ रुग्णांचे श्राव तपासण्यात आले आहे.बाधित रुग्णांचा दहा लाखांत १७.४२ टक्के आहे.तर उपचारानंतर २५७ रुग्णांना घरी पाठविण्यात आरोग्य विभागास यश आले आहे.बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ६९.२७ टक्के असून आतापर्यंत पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू ओढवला असल्याची माहितीही आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.
कोपरगाव तालुक्यात गत सप्ताहात मोठी कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली होती.त्यामुळे कोपरगाव शहर पुन्हा एकदा टाळेबंदीकडे वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले होते मात्र गत दोन दिवसापासून मात्र या रुग्ण वाढीत उतार आला होता त्यामुळे तालुक्याला दिलासा मिळाला असताना आज पुन्हा एकदा विक्रमी कोरोना रुग्ण वाढ झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात १८ रुग्ण बाधित आढळले असून यात सुभद्रानगर येथील पाच रुग्ण असून यात चार महिला (१६,३६,७१,१९) व एक पुरुष (२१) यांचा समावेश आहे.तर धारणगाव रोड येथील तीन पुरुष असून त्यात २०,२६,५५ वर्षाच्या नागरिकांचा समावेश आहे.या शिवाय गांधीनगर येथील चार रुग्ण बाधित असून यात दोन पुरुष (१७,२०) तर दोन महिला ( ३९,१६) यांचा समावेश आहे.या खेरीज इंदिरानगर येथील ५२ वर्षीय पुरुष तर साई प्रभुनगर येथील ३४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.या शिवाय काले टॉवर येथील ३५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.या शिवाय चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीतील १४ वर्षीय मुलगी तर ३२ वर्षीय तरुण यांचा समावेश आहे.
या शिवाय नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे श्राव तपासणीसाठी पाठवले होते त्यात कोपरगाव शहरातील ४०,४१ आणि ६७ वर्षीय पुरुष यांचा समावेश असून सर्व वीस नागरिक बाधित आढळल्याची माहितीही डॉ.विधाते यांनी शेवटी दिली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.