जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

विखे गटाचे उपसरपंच जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवले अपात्र

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्टया अत्यंत जागरूक समजल्या जाणाऱ्या एकरुखे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अर्चना रवींद्र पगारे व त्यांचे सासरे अंबादास सीताराम पगारे यांनी ग्रामपंचायत हद्दीत व सरकारी ग.नं.४२७ मध्ये गायीसाठी छप्पर व वैयक्तिक सौचालय बांधून अतिक्रमण केल्या प्रकरणी तक्रारदार नानासाहेब खुशालराव गाढवे यांनी प्रथम औरंगाबाद खंडपीठ व नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती त्याबाबत नुकतीच सुनावणी पूर्ण होऊन त्यात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या प्रकरणी उपसरपंच अर्चना पगारे या दोषी आढळल्याने त्यांना अपात्र घोषित करुन त्यांचे पद रद्द केले आहे.या प्रकरणी अड्,योगेश खालकर यांनी काम पाहिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी उपसरपंच पगारे यांना आपले म्हणणे मांडण्यास संधी दिली होती.त्यात त्यांनी,”आपल्या बरोबर या गट क्रमांकाच्या अनेकांचे अतिक्रमणे असल्याचे मान्य करून आपण ते काढण्यास तयार असल्याचे” म्हटले होते.या प्रकरणी उपधीक्षक भूमी अभिलेख राहाता यांच्या अहवालात हे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले होते.सदर उपसरपंच अर्चना पगारे या एकत्रित कुटुंबातील असल्याने बचाव करण्याचा प्रयत्न करून पाहिला.राहाता मंडलाधिकारी यांनीही आपल्या अहवालात हे अतिक्रमण झाले असल्याचे मान्य केले होते.त्यांनी देखील अतिक्रमण झाले असल्याचा अहवाल दिला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राहाता तालुक्यातील एकरुखे ग्रामपंचायत हद्दीत त्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अर्चना रवींद्र पगारे व त्यांचे सासरे अंबादास सीताराम पगारे यांनी सरकारी गट क्रं.४२७ मध्ये अतिक्रमण केले असल्याची बाब उघड केली होती व याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करून ते बेकायदा अतिक्रमण काढण्याची रीतसर मागणी केली होती.मात्र ग्रामपंचायतीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यास वारंवार अभय दिले होते.त्यामुळे जेष्ठ कार्यकर्ते नानासाहेब गाढवे यांनी या बाबत मुबंई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अड्.अजित काळे यांच्या मार्फत जनहित याचिका (क्रं.१२८६६/२०१८) दाखल केली होती व उच्च न्यायालयाचे या प्रकरणी लक्ष वेधून घेतले होते.या बाबत उच्च न्यायालयात सुनावणी होऊन त्यात न्यायालयाने तक्रारदार नानासाहेब गाढवे यांना रितसर तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल करण्याचे फर्मान सोडले होते.

त्या नंतर गाढवे यांनी या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडॆ रीतसर तक्रार दाखल करून या बाबत हे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी केली होती.या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उपसरपंच पगारे यांना आपले म्हणणे मांडण्यास संधी दिली होती.त्यात त्यांनी,”आपल्या बरोबर या गट क्रमांकाच्या अनेकांचे अतिक्रमणे असल्याचे मान्य करून आपण ते काढण्यास तयार असल्याचे” म्हटले होते.या प्रकरणी उपधीक्षक भूमी अभिलेख राहाता यांच्या अहवालात हे अतिक्रमण असल्याचे सिद्ध झाले होते.सदर उपसरपंच अर्चना पगारे या एकत्रित कुटुंबातील असल्याने बचाव करण्याचा प्रयत्न करून पाहिला.राहाता मंडलाधिकारी यांनीही आपल्या अहवालात हे अतिक्रमण झाले असल्याचे मान्य केले होते.त्यांनी देखील अतिक्रमण झाले असल्याचा अहवाल दिला होता.त्यामुळे त्यांचे अन्य पुरावे मान्य करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी नकार देऊन या उपसरपंच अर्चना पगारे याना अपात्र घोषित केले आहे.व त्यांचे पद रद्द करण्यात आले आहे.त्यामुळे सरकारी जागेत अतिक्रमण करून पदे भोगणाऱ्या जिल्हाभरातील सदस्य व पदाधिकाऱ्यांत खळबळ उडाली आहे.या बाबत तक्रारदार नानासाहेब गाढवे यांची कायदेशीर बाजू अड्,योगेश खालकर यांनी मांडली त्यांना अड्.रमेश दुशिंग,अड्.राहुल वाकचौरे यांनी सहाय्य केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे जेष्ठ नेते नानासाहेब गाढवे यांनी स्वागत केले आहे. व अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सत्ताधिशांना या निकालाने चपराक बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close