जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

…या शहरात डेंग्यूच्या रुग्णात वाढ,सावध होण्याची गरज !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव – (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्ह्यात डेंग्यू क्षेत्राचा फैलाव वाढू लागला असून आहे.गेल्या महिनाभरात ४९ रुग्ण आढळले असून कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य वाढले असून शहरात 03 तर ग्रामीण भागात 04 रुग्ण असे एकूण 07 रुग्ण  आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली असून या प्रकरणी आरोग्य विभागाने तातडीने फवारणी करणे गरजेचे असल्याचे मागणी नागरिकांनी नुकतीच आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

डेंग्यू ताप किंवा डेंगी ताप हा एक विषाणूजन्य रोग आहे.हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो.इडिस इजिप्‍ती डासाच्या चावण्यामुळे तो प्रसारित केला जातो.हा एक तीव्र,फ्लूसारखा आजार आहे.संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसानंतर मनुष्याला हा रोग होतो.ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत.डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ.डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून,त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो.मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप.सोबत डोके-डोळे दुखणे,अंगदुखी,अशक्तपणा,अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.

“डेंग्यू ताप हा लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो.मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप.सोबत डोके-डोळे दुखणे,अंगदुखी,अशक्तपणा,अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात”- डॉ.कृष्णा फौलसुंदर,ग्रामीण रुग्णालय,कोपरगाव.

राज्यात वर्तमानात गत दोन महिन्यापासून पावसाळी वातावरण आहे.त्यामुळे सूक्ष्म जीवांना वाढण्यास हे पोषक समजले जात आहे.त्यामुळे कोपरगाव शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर डास वाढले आहे.परिणामी पावसामुळे डेंग्यूचे रुग्णही वाढले आहे.परंतु अद्याप कुठेही मृत्यूची नोंद नाही मात्र हीच स्थिती फार दिवस राहिल अशी शक्यता नाही.त्यामुळे आरोग्य विभागाने सावध होणे गरजेचे आहे.अन्यथा रुग्ण संख्येत वाढ होण्यास वेळ लागणार नाही.  

   या संबंधी आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी म्हंटले आहे की,”डेंग्यू आणि सिफा विषाणू हा मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यातही नगरसह राज्यात अनुकूल वातावरण आहे.त्यासाठी नागरिकांनी प्रतिबंध हाच उपाय समजून त्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे.त्यासाठी घरातील पाणी साठे आठवड्यातून एकदा स्वच्छ आणि कोरडे करावे,पाणी साठे झाकून ठेवणे गरजेचे आहे.घराभोवती अडगळ सामान करवंट्या जेथे स्वच्छ पाणी साठवले जाईल अशी ठिकाणे नष्ट करावी.डासांची निर्मिती होऊ न देणे हाच आजारापासून बचाव आहे.घरावरील पाण्याच्या टाक्या,स्वच्छता गृहांचे पाईप आदी स्वच्छ कपड्याने झाकून ठेवावें.वर्तमानात डेंग्यू आणि झिकाचे रुग्ण कमी असले तरी असेच वातावरण आणखी काही काळ पोषक राहिले तर रुग्णाच्या संख्येत वाढ होऊ शकते असेही त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close