कोपरगाव तालुका
होम कोरोंटाईनचे उल्लंघन,कोपरगावात एकावर गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोपरगाव शहर आणि तालुक्यात संचारबंदी असताना व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी होम कोरोंटाईंचा शिक्का मारलेला असतानाही खडकीनाका कोपरगाव या ठिकाणी आपल्या किराणा दुकानात ग्राहकांना किराणा माल विक्री करताना एक परदेशातून कोपरगाव शहरात आलेल्या पंचवीस वर्षीय तरुणावर कोपरगाव शहर पोलिसानी भारतीय दंड कलम १८८(२) प्रमाणे पो.कॉ.संदीप शांताराम काळे यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शहरात संचारबंदी लागू असताना बाजार समिती रस्त्याने या आरोपीचा पिताही फिरताना आढळल्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्याना चांगलाच लाठी प्रसाद दिला आहे.त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. त्यानंतर सहा नवे रुग्ण आढळले आहेत ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.या सोबत नागरिकांना संचारबंदी लागू केली आहे.जे नागरिक बाहेर देशातून आले आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने त्यांच्या हातावर होम कोरोंटाईंचा शिक्का मारून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता घेतली आहे.व त्यांनी घरातच राहून आगामी पंधरा ते वीस दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मात्र काहींना याचे भान राहिलेले दिसत नाही.त्यामुळे राज्यात रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या साठी जिल्हाधिकाऱ्यांनी सक्त ताकीद दिली असून नियमांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.कोपरगाव शहरात टाकळी नाका या ठिकाणी पश्चिममुखी असलेल्या एका दुकानात एक तरुण परदेशातून आल्याने त्याची तपासणी करून त्याला जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी घरातच राहण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याचे त्याने पालन केले नाही.हि बाब काही नागरिकांनी कोपरगाव शहर पोलिसांच्या लक्षात आणून दिली असताना याची खातरजमा करण्यासाठी शहर पोलिसांची गाडी त्या परिसरात गस्त घालत असताना त्यांना टाकळी नाका या ठिकाणी हा तरुण आपल्या दुकानात ग्राहकांना किराणा माल विक्री करताना आढळून आला.त्याची गंभीर दखल पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी घेऊन पो.कॉ.संदीप काळे यांना त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.काळे यांनी तात्काळ सकाळी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.११३/२०२० भा.द.वि.कलम १८८(२) अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने शहरात चुकीचे वागणाऱ्या असामाजिक तत्वांना चाप बसण्यास मदत होणार आहे.