जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात भाजीपाला बाजार अखेर बंद !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दिनांक१३ मार्च पासून लागू केलेला असून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणून कोपरगांव शहरातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आज सोमवार दि.२३ मार्च पासून बाजारतळ येथे भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. त्या ऐवजी शहरातील १८ वेगवेगळ्या ठिकाणी चौकात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.

राज्यात कोरोनाने विष्णुने कहर माजवला असून हा विषाणूपासून जनतेच्या जीवाला धोका आहे त्यामुळे राज्यात या विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने वेगवेगळे पर्याय अवलंबला असून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.त्यामुळे नागरिकांना सांगूनही शहरातील नागरिक भाजीपाला बाजारात गर्दी करत होते.त्यातून जनतेच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता होती म्हणून मूळ जागेवरील भाजीपाला बाजार बंद करण्यात आला आहे.व त्या साठी पर्यायी जागा शोधण्यात आल्या आहेत

त्यांनी पुढे म्हटले आहे की,राज्यात कोरोनाने विष्णुने कहर माजवला असून हा विषाणूपासून जनतेच्या जीवाला धोका आहे त्यामुळे राज्यात या विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने वेगवेगळे पर्याय अवलंबला असून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.त्यामुळे नागरिकांना सांगूनही शहरातील नागरिक भाजीपाला बाजारात गर्दी करत होते.त्यातून जनतेच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता होती म्हणून मूळ जागेवरील भाजीपाला बाजार बंद करण्यात आला आहे.व त्या साठी पर्यायी जागा शोधण्यात आल्या आहेत.प्रस्तावित जागेत व्यापाऱ्यांनी एका ठिकाणी जास्तीत जास्त ५ विक्रेते आपला भाजीपाला विक्रीसाठी मांडू शकतील.तसेच आपल्या दुकानात गर्दी होणार नाही व दोन दुकानातील अंतर हे किमान ८ ते १० फुट राहील याची दक्षता घ्यावी.

सदरची परिस्थिती ही ३१ मार्च अखेर राहील किंवा यात पुढेही वाढ होवू शकते.भाजीपाला,फळे विक्रीसाठीची ठिकाणे खालील प्रमाणे प्रस्तावित करण्यात आली आहेत. साईबाबा कॉर्नर,नवीन ओटे (सप्तर्षीमळा पूर्व बाजू),बाजारतळ,तहसील मैदान,बेट नाका,मोहिनीराज नगर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, येवला नाका,छत्रपती संभाजी महाराज चौक, अहिंसा स्तंभ,महात्मा गांधी चौक (गांधीनगर),श्रद्धानगरी चौक,समता पतसंस्था परिसर,खडकी रोड टाकळी नाका, सप्तश्रृंगी मंदिराजवळ निवारा, इदगाह मैदान,जिजामाता उद्यान लक्ष्मीनगर (पाण्याची टाकीजवळ) पर्यायी सोय करण्यात आली आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी आपला भाजीपाला हातगाडीवर रस्त्याने व गल्ली निहाय विक्री करावा त्यामुळे गर्दी टाळण्यास मदत होईल.जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचे आदेश लागू असल्याने,५ किंवा ५ पेक्षा अधिक नागरिकांनी एकाच ठिकाणी एकत्र येवू नये याची दक्षता घ्यावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंडसंहिता (४५/१८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय,कायदेशीर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ कलम ४३ (१) मधील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील.असा इशाराही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी शेवटी दिला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close