जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘एक तास राष्ट्रवादीसाठी’योजनेचा कोपरगाव तालुक्यात प्रारंभ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे राज्याच्या विकासाचे विचार घराघरात पोहोचावे यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून गुढीपाडव्यापासून कोपरगाव विधानसभा मतदार संघात राबविण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी त्याची सुरुवात त्यांच्या माहेगाव देशमुख येथून केली आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.विचारांची देवाण घेवाण होवून राज्याचा समृद्ध,सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागे उद्देश आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी विविध तालुक्यातील गावात उपस्थित राहून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रभावी-प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमाची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.त्याची अंमलबजावणी कोपरगाव तालुक्यात माहेगाव देशमुख या ठिकणी सुरु झाली आहे.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी संभाजी काळे,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन काळे,सोसायटीचे अध्यक्ष संजय काळे,उपसरपंच विकास रणशिंग,बापूसाहेब जाधव,अशोक विश्वनाथ काळे,मधुकर काळे,विठ्ठल लांडगे,साहेबराव देशमुख,सोसायटीचे संचालक,ग्रामपंचायत सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना आ.काळे म्हणाले की,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.विचारांची देवाण घेवाण होवून राज्याचा समृद्ध,सर्वांगीण विकास व्हावा हा त्यामागे उद्देश आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खा.शरद पवार यांचे नेतृत्व लाभले आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य अनेक संकटाचा सामना करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे कोपरगाव मतदार संघाचा अडीच वर्षात प्रतिकूल परिस्थितीत झालेला सर्वांगीण विकास सांगतो आहे.अजूनही कशा प्रकारे अधिक विकास साधता येईल,सर्वसामान्य नागरीकांच्या अजून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेवून आपल्या गावाचा,शहराचा जास्तीत जास्त विकास कसा साधला जाईल त्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मजबूत संघठन करून राष्ट्रवादीच्या विचारांची फळी निर्माण करण्याचे आदेश आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा अडीच वर्षात झालेला विकास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आणि घराघरात पोहोचवा असे त्यांनी आवाहन केले.यावेळी माहेगाव देशमुख येथील श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या विकासासाठी ना.आशुतोष काळे यांनी ४९.९७ लक्ष निधी मिळवून दिल्याबद्दल माहेगाव देशमुख ग्रामस्थ व श्री दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ना.काळे यांचा सत्कार करण्यात आला.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close