जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दोन दुचाकीची टक्कर,पोलिसाला धडकवले,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव-कोळपेवाडी मार्गावर कुंभारी शिवारात गणपती मंदिराजवळ दोन दुचाकीची ( हिरो होंडा स्प्लेंडर एम.एच.सी.जे.१९६४ व बजाज पल्सर एम.एच.१६ एन.३४९) या मध्ये जोराची धडक होऊन त्यात कोपरगाव कॉलनीतील पोलीस कर्मचारी सूर्यभान धोंडिबा पवार (वय-४८) यांना धडक देण्याबरोबरच दुचाकीस्वार राजेंद्र साळवे,व विठ्ठल रेवजी घुले हे दोघे असे तिघे जखमी झाल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सूर्यभान पवार हे आपल्या काही कामासाठी कोळपेवाडीकडे जात असताना हिरो होंडा स्प्लेंडर वरील चालक अनिल पोपट बर्डे हा इसम आपली दुचाकी जोराने चालवत होता.दरम्यान कोळपेवाडी रस्त्यावर कुंभारी शिवारात गणपती मंदिराजवळ त्यांचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांची गाडी फरफटत जाऊन समोरून येणाऱ्या गाडी वर धडकून त्यांनी आपल्या गाडीवरील राजेंद्र साळवे, विठ्ठल घुले याना जखमी केलेच पण समोरून आपल्या बजाज प्लसर गाडीवरून येणाऱ्या पोलीस कर्मचारी सूर्यभान पवार यांनाही या विचित्र अपघातात जखमी केले आहे.असे या अपघातात तिघे जखमी झाले आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी सूर्यभान पवार यांनी दुचाकीस्वार अनिल बर्डे यांच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.६३/२०२० भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपी अनिल पोपट बर्डे रा.कुंभारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन.भताने हे करीत आहेत.सुदैवाने या कोणाच्या जीवितास धोका झाला नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close