कोपरगाव तालुका
डोक्यात वीट मारून एक जखमी,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत गोई नदीजवळ फिर्यादीचे घरासमोर फिर्यादीचे घेतलेले पन्नास रुपयांच्या कारणावरून आरोपी विजय भाऊसाहेब जाधव रा.मोर्विस याने फिर्यादी बाळू दत्तू मोरे (४८) यास शिवीगाळ दमदाटी,करून लाथा बुक्यांनी मारहाण करून समोर पडलेली विट फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यास जखमी केल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.६२/२०२० भा,द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विजय जाधव यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. प्रदीप काशीद हे करीत आहेत.