गुन्हे विषयक
बस स्थानकात चोरट्यांचा उपसर्ग,महिलेचे गंठण लांबवले

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगारात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास नाशिक येथील प्रवासी महिला उभी असताना तिच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सुमारे एक तोळा वजनाचे सोन्याचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठन चोरून नेले असल्याचा गुन्हा नाशिक,विसेमळा येथील फिर्यादी महिला मंदाकिनी अशोक आहेर (वय-५८) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे चोरट्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गोदावरी उजव्या कालव्याच्या लगत विनोद घोगटे यांच्या दुकानाची अज्ञात चोरट्यानी वरील पत्रा कापून आत उतरून १० ते १२ हजार रुपयांच्या विविध मुद्देमालाची व नजीकच्या शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या तांब्याच्या तारांची चोरी केली असल्याचे उघड झाले असताना आज दुपारी पुन्हा एक घटना उघड झाली आहे.त्यात नाशिक येथील विसेमळा येथील रहिवासी महिला काही कामानिमित्त आपल्या नातेवाईकांकडे आलेली होती.ती परत जाण्यासाठी कोपरगाव येथील राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकात दुपारी १२ वाजता उभी असताना अज्ञात चोरट्याने तिच्यावर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील एक तोळा वजनाचे सोण्याचे मिनी गंठण हातोहात लंपास केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी महिला यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस दप्तरी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक देशमुख यांचेसह पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा क्रं.४१९/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दत्तात्रय तिकोणे हे करत आहेत.