जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात वाहन चालकास सहा महिन्याची सक्त मजुरी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या मारुती ओमनी कारने धडक देऊन कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील इसम राजू अब्दुल शेख (वय-७५) यांच्या त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाविरुद्ध फिर्यादी मुन्ना राजू शेख यांनी कोपरगाव न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच लागला असून आरोपी गणेश जगन्नाथ कुर्हे रा.शिंगणापूर यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रं.३ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता २५५(२)प्रमाणे गुन्ह्याची शाबीती होऊन भा.द.वि. कलम २७९ खाली तीन महिने सक्त मजुरी रुपये १ हजार दंड,दंड न भरल्यास एक महिना साधी कैद,भा.द.वि. कलम ३०४ (अ) खाली सहा महिने सक्त मजुरी व रुपये ५० हजार रुपये दंड.दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद,मोटार वाहन कायदा कलम १३४(ब)/१७७ खाली रुपये १०० दंड ठोठावला असून ५० हजार रुपये दंडाची रक्कम फिर्यादिस वर्ग करण्याचे आदेश न्यायालयाने फर्मावले आहे.

रस्त्यावर बेजबाबदारीने वाहन चालविणाऱ्या चालकांना न्यायालयाने पन्नास हजारांचा दंड व सहा महिने साधी कैद अशी शिक्षा फर्मावुन अतिरिक्त मुख्य न्यायालयाने चांगलाच हिसका दाखवला आहे.शिवाय या आरोपी चालकाचा चारचाकी वाहन परवाना सहा महिन्यासाठी अवैध ठरवला आहे.त्या बाबत अहमदनगर येथील विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना तसे आदेश पारित केले आहेत त्यामुळे बेदरकार वहाने चालविणाऱ्या प्रवृत्तीस चाप बसण्यास चांगली मदत होणार आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव शहराच्या जवळ चार कि.मी.अंतरावर वैजापूर रस्त्यालगत शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीत राजू अब्दुल शेख हे वयोवृद्ध नागरिक रहिवासी होते. त्यांना त्याच गावातील मारुती ओमनी चालक गणेश जगन्नाथ कुर्हे याने ४ डिसेंबर २०१६ रोजी धडक दिली होती त्यात गंभीर जखमी होऊन त्यांना उपचारार्थ नाशिक व नंतर शिर्डी येथे साईबाबा रुग्णालयात भरती करण्यात आले होते.मात्र त्यांना वाचविण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना अपयश येऊन त्यात त्यांचे ७ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले होते.त्यांच्या मुलगा मुन्ना शेख यांनी या अपघाता प्रकरणी आधी शिर्डी येथे गुन्हा दाखल करून नंतर तो कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला होता.कोपरगाव पोलिसानी या प्रकरणी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी क्रं.३ यांचे न्यायालयात संक्षिप्त फौजदारी खटला दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच पूर्ण झाली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने नुकताच वरील निकाल दिला असून अपघातग्रस्त कुटुंबास मोठा दिलासा दिला आहे.रस्त्यावर बेजबाबदारीने वाहन चालविणाऱ्या चालकांना चांगलाच हिसका दाखवला आहे.शिवाय या आरोपी चालकाचा चारचाकी वाहन परवाना सहा महिन्यासाठी अवैध ठरवला आहे.त्या बाबत अहमदनगर येथील विभागीय परिवहन अधिकाऱ्यांना तसे आदेश पारित केले आहेत त्यामुळे बेदरकार वहाने चालविणाऱ्या प्रवृत्तीस चाप बसण्यास चांगली मदत होणार आहे.सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता सो.अ. व्यवहारे यांनी काम पाहिले होते.या निकालाकडे कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागून होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close