जाहिरात-9423439946
निवडणूक

राज्यसभा निवडणूक विजयाबद्दल…या शहरात आनंदोत्सव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचे पडसात कोपरगावात उमटले असून कोपरगाव भाजपने कोपरगाव शहरात आज फटाके फोडून व गुलाल उधळून आपला आंनद व्यक्त केला आहे.

“सत्तारूढ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशा संघर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे डावपेच आखून सत्तारूढ आघाडीतील तीनही पक्षांच्या रणनीतीचा पराभव केला.संख्याबळ कमी असतांनाही अपक्ष आमदारांशी चर्चा करून त्यांना आपलेसे केले व मोठा विजय प्राप्त केला.गुप्त मतदान नसतानाही मिळविलेला हा विजय कौतुकास्पद आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

राज्यसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे.यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पहाटेच्या वेळी तिन्ही जागा जिंकून पुन्हा एकदा छोबीपछाड केलं आहे.पुन्हा यासाठी की याआधी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच अजित पवारांसोबत शपथ घेऊन उद्धव ठाकरेंना धोबीपछाड केलं होतं.राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा भाजपनं जिंकली आहे.या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभूत केलं आहे.याचा राज्यात भाजपने आंदोत्सव साजरा केला असून कोपरगाव शहरात त्याचा अनुभव आला आहे.

भारतीय जनता पार्टी,वसंत स्मृती कार्यालायचेवतीने आज कोपरगाव शहरात फटाके फोडून, गुलाल उधळून,पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष श्री.विजय वहाडणे,अध्यक्ष विनायक गायकवाड,सतिश कृष्णानी,प्रभाकर वाणी,माजी नगरसेवक संजय कांबळे,रवींद्र बागरेचा,पी.एम.पाटील,विजय जोशी,भागवत सर,सुरेश कांगोणे,गणेश वाणी,संजय वायखिंडे,सतीश वायखिंडे,हिवाळे,ठोंबरे आदी निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

त्यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हटले आहे की,”सत्तारूढ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशा संघर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाणाक्षपणे डावपेच आखून सत्तारूढ आघाडीतील तीनही पक्षांच्या रणनीतीचा पराभव केला.संख्याबळ कमी असतांनाही अपक्ष आमदारांशी चर्चा करून त्यांना आपलेसे केले व मोठा विजय प्राप्त केला.गुप्त मतदान नसतानाही मिळविलेला हा विजय कौतुकास्पद आहे”म्हणावा लागेल.
दरम्यान आगामी २० जून रोजी संपन्न होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने सत्तारूढ महाविकास आघाडीचे धाबे आजच दणाणले दिसत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close