जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील पाण्यावरील राजकारण थांबवा-आवाहन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नागरिकांना आपल्याला पिण्याचे पाणी मिळणे गरजेचे असून ते कोण देतो कुठुन देतो यांचेशी काहीही देणे-घेणे नाही तरी कोपरगाव तालुक्यातील राजकीय नेत्यांनी या बाबत राजकारण करून निवडणूकपूर्व करमणूक करण्याचे तत्काळ थांबवावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपल्यासह कोपरगावातील सर्वच राजकिय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एक पथ्य पाळणे आवश्यक आहे.पाणी या विषयावर कुणीही एकमेकांवर आरोप करणे जनतेलाही मान्य नाही.”श्रेय कुणीही घ्या पण आम्हाला नियमित पाणी द्या” हे जनतेचे मागणे आहे.वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणी प्रश्न हा सर्वांच्या सहकार्यानेच सुटू शकतो.पाणी प्रश्नावर आरोप प्रत्यारोप,मुलाखती,प्रतिक्रिया यातून फक्त करमणूक होईल”-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगर परिषद.

कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसावर आली आहे.वर्तमान पदाधिकारी व नगरसेवक यांची मुदत येत्या २९ डिसेंबर रोजी संपत आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात नेहमीची येतो पावसाळा या तत्वानुसार आरोप-प्रत्यारोप यांचा राजकीय शिमगा सुरु झाला आहे.त्यात प्रमुख दोन राजकीय ध्रुव चर्चेत असुंन त्यातून काहीही साध्य होत नाही हे गत सत्तर वर्षात निष्पन्न झाले आहे.शहराचा व तालुक्याचा उणे विकास सुरु आहे.तर राजकीय नेत्यांचा मात्र बेरजेचा.दर वेळेस नवीन कुभांड उभे करून मतांची बेगमी करणे हा त्यांचा नेहमीचा धंदा सुरु आहे.यावेळीही गत निवडणुकीत रंगलेल्या वगनाट्याचा पुढील भाग आकारास येत असताना दिसत आहे.त्यातून नुकतेच एका ईशान्य गडावरील युवराजाने आधी आपले प्यादे पुढे करून त्याची सुरुवात केलेली दिसत आहे.विशेष म्हणजे यात काही माध्यम भाट कुऱ्हाडीचा दांडा होऊन सामील व्हावे या सारखे आश्चर्य तालुक्यात नवे मानले पाहिजे.यातूनच आज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”कोपरगाव शहराची पाणी समस्या कायमस्वरूपी दुर करण्याची सर्वच राजकिय नेते व नागरिकांची इच्छा आहे.त्यासाठी सर्वजण आपापल्यापरीने प्रयत्नशील आहेत.वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे सर्व प्रकारचे कर भरणाऱ्या करदात्यांना पाणी प्रश्न लवकर सुटावा अशीच अपेक्षा आहे.विविध राजकिय पक्ष व राजकिय नेते यांच्यात सुरू असलेला संघर्ष,वादविवाद,आरोपप्रत्यारोप याच्याशी जनतेला काही एक देणेघेणे नाही.सध्या ५ नं. साठवण तलाव,१२० कोटी रु.च्या योजनेला मिळालेली तांत्रिक मान्यता आणि निळवंडे पाणी आरक्षण यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कोपरगाव नगरपरिषदेला घातलेली अट याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थेने अशी अट घालण्याची गरजच नव्हती.खरे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाकडून फक्त तांत्रिक मान्यतेची अपेक्षा होती.पाणी किती ठिकाणांहून घ्यायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोपरगाव नगरपरिषद सभागृहाचा आहे.मी लवकरच सर्वसाधारण सभा घेऊन कोपरगावसाठी नांदूरमध्यमेश्वर व निळवंडे येथून मंजुर असलेले पाणी मिळालेच पाहिजे असा ठराव मांडणार आहे.सर्वच नगरसेवक हा ठराव बहुमताने मान्य करतील असा आशावाद व्यक्त करून भविष्यातही शहरासाठी पाणी कमी पडू नये यासाठी दोन्ही ठिकाणचे पाणी आरक्षण अतिशय महत्वाचा असल्याचा आश्चर्यकारक दावा ठोकला आहे.
आता तर साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळेच असल्याने ते या दोन्ही पाणी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करतील अशी आपल्याला खात्री आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व संबंधित विभागाचे अधिकारी या कामांचा सतत पाठपुरावा करत असल्याचे कोडकौतुक केले आहे.नांदूरमध्यमेश्वर मधून आपले ५.९६ द.ल.घ.मी. पाणी आरक्षण २०३६ पर्यंत आहे.त्यांनतर ते वाढवून ७.२२ द.ल.घ.मी.पाणी मिळावे अशीही मागणी केलेली आहे.या पाणी प्रश्नी आपण तरी कुणावर आरोप प्रत्यारोप व श्रेय घेण्याच्या फंदात पडणार नाही.पाणी प्रश्न व शहर विकासाच्या योजना मार्गी लावणे हाच आपला एकमेव उद्देश आहे.जनतेलाही हिच अपेक्षा असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close