जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ग्रामीण विद्यार्थी गुणवत्तेत कमी नाही-आ.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गुणवत्तेच्या बाबतीत ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेत कमी नसतात,ध्येय गाठायचा मनाशी निश्चय केल्यास सर्व काही शक्य असते. तुमची परिस्थिती कशीही असो तुमची परिस्थिती तुमच्या यशात कधीच अडसर ठरू शकत नाही हे कोळगाव थडीच्या सुपुत्रांनी दाखवून दिले असल्याचे गौरवद्गार कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी एक कार्यक्रमात बोलताना काढले आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडीचे भूमीपुत्र असलेले डॉ.अनंत शिरसाठ यांना फ्रान्स विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी,मानस वाकचौरे यांची जपान येथे उच्च शिक्षणासाठी निवड,डॉ. संदीप निंबाळकर यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्दल,सतिश पानगव्हाणे यांनी पुणे इथे जागतिक दर्जाचे शैक्षणिक संकुल उभारल्याबद्दल व कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण यांना राज्यस्तरीय पुरस्कार

किरण मेहरखांब यांची जी.एस.टी.विभागात राज्य  कर निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल डॉ.संदीप निंबाळकर यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विषयात संशोधन मार्गदर्शकपदी निवड झाल्याबद्दल भूमिपुत्रांचा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे होते.

सदर प्रसंगी सभापती पोर्णिमा जगधने, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे   व्ध्यउपाध्यक्ष सुधाकर रोहोम संचालक राजेंद्र मेहरखांब अरुण चंद्रे कोळगाव थडीच्या सरपंच मीनल गवळी, उपसरपंच सुनील चव्हाण, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, उपसरपंच मच्छिन्द्र हाळनोर, सदस्य डॉ. आय.के.सय्यद, माहेगाव देशमुख सोसायटीचे चेअरमन रविंद्र काळे, शहाजापुरचे उपसरपंच बाळासाहेबजी ढोमसे उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”कोळगाव थडीच्या सुपुत्रांनी मिळविलेले यश दैदीप्यमान असून हे विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत याचा अभिमान वाटतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम घ्यावेच लागतात. ठरविलेले ध्येय गाठायचे असेल तर परिस्थितीचा बागुलबुवा उपयोगाचा नाही, तुमची परिस्थिती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही त्यासाठी फक्त कष्ट करायची तयारी लागते हे या सुपुत्रांनी दाखवून दिले असून त्याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा” असे आवाहन आ. काळे यांनी यावेळी केले.   

यावेळी राहुल जगधने, माधवराव जाधव, बाबुराव निंबाळकर, मोहनराव गायकवाड, दिनकर वाकचौरे, नंदकिशोर निंबाळकर, भाऊसाहेब लुटे, राजेंद्र निंबाळकर,कैलास लुटे, चंद्रशेखर गवळी,राजेंद्र गवळी, विलास निंबाळकर, माधवराव मुटकुळे, सोमनाथ चव्हाण, विजय शिरसाठ,संजय वाकचौरे, शामराव मेहरखांब, बबनराव वाकचौरे, भाऊसाहेब कोळपे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बबनराव वाकचौरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचलन अरुण रुपवते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close